Bigg Boss Marathi 2, 12 June, Episode 18 Updates: शिवानी सुर्वे चा 'बिग बॉस'चे नियम धाब्यावर बसवत घराबाहेर पडण्याचा हट्ट
बाप्पा,शिवानी,नेहा आणि अभिजीत बिचुकले यांच्यापैकी कोणाला पुन्हा कॅप्टनसीच्या शर्यतीत जाण्याची संधी मिळणार?
बिग बॉस मराठी 2 च्या घरात शाळा सुटली पाटी फुटली या खेळासोबतच शिवानी सुर्वेमुळे सारा एपिसोड रंगला. शिवानी सुर्वेला(Shivani Surve) घराला बाहेर पडायचं आहे. हा एकच हट्ट होता. शिवानीने सुरुवातीला त्रास होत आहे असे सांगत खेळातून माघार घेतली. त्यानंतर तिने घराबाहेर पडायचं असं सांगत माईक काढून ठेवत घरातले नियम धाब्यावर बसवले. त्यानंतर घरातल्या सदस्यांना तिने सल्ले देखील घेतले. दिवसभर घरात हट्ट केल्यानंतर रात्री नेहा शितोळे (Neha Shitole) सोबत शिवानीला कन्फेशन रूममध्ये बोलावण्यात आलं. तेव्हा देखील शिवानीला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही घराबाहेर पडण्याचा निर्णय ठाम असल्याने ही गोष्ट ' कायद्याच्या' कक्षेत येईल असं सांगितले आहे. त्यानंतर शिवनीची भाषा थोडी नरम झाली आणि समजुतीने हा प्रश्न सोडण्याचा प्रस्ताव ठेवला. बिग बॉस मराठी 2 ची चर्चित स्पर्धक 'शिवानी सुर्वे'चा बॉयफ्रेंड 'अजिंक्य' नेमका कोण? पहा फोटोज
बिग बॉसच्या घरात पराग आणि रुपाली नंतर आता वीणा आणि शिव मध्ये काय रंगतंय का? याची देखील वैशाली आणि शिव मध्ये चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. पण अद्याप तसं काही नसल्याचं सांगण्यात शिवने हा केवळ मस्करीचा भाग असल्याचं सांगितलं आहे. बिग बॉसच्या घरात १७ व्या दिवशी पुन्हा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामधील खेळ रंगायला सुरुवात झाली. यामध्ये नापास झालेल्या चार विद्यार्थयांमधून एकाला पुन्हा पास करण्याची संधी मुख्याध्यापिका किशोरी शहाणे यांना मिळणार आहे. अभिजीत बिचुकले यांच्या 'इंग्रजी' ते लव्हगुरू पराग कान्हेरे यांच्या वर्गात आज काय काय होणार?
त्यामुळे बाप्पा,शिवानी,नेहा आणि अभिजीत बिचुकले यांच्यापैकी कोणाला पुन्हा संधी मिळणार? याबाबत उत्सुकता वाढली आहे.