बिग बॉस फेम शहनाज गिलच्या वडिलांवर बलात्काराचा गुन्हा दाखल; बंदुकीचा धाक दाखवून अत्याचार केल्याचा महिलेचा आरोप
मीडिया रिपोर्टनुसार शहनाजचे वडील संतोख सिंह सुख (Santokh Singh) यांच्यावर बंदुकीचा धाक दाखवून बलात्काराचा आरोप आहे,
बिग बॉस 13 (Bigg Boss 13) ची प्रसिद्ध स्पर्धक शहनाज गिलच्या (Shehnaaz Gill) वडिलांविरूद्ध बलात्काराचा (Rape) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार शहनाजचे वडील संतोख सिंह सुख (Santokh Singh) यांच्यावर बंदुकीचा धाक दाखवून बलात्काराचा आरोप आहे, हा आरोप जालंधर येथील 40 वर्षीय महिलेने केला असून, बलात्काराचा गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार संतोख सिंह सुख यांनी आधी या महिलेला धमकावले आणि नंतर बंदूकीचा धाक दखवून तिच्यावर बलात्कार केला. याबाबत गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ती आणि जलंधर येथील लक्की संधू उर्फ रणधीर सिंह संधू गेल्या 12 वर्षांपासून एकमेकांना ओळखत आहेत आणि चांगले मित्र आहेत. मात्र काही कारणास्तव दोघांमध्ये वाद झाले, त्यानंतर संतोख सिंह यांच्या घरी लक्की असल्याची महित्ती या महिलेला मिळाली. ही महिला लक्कीला भेटायला गेली असता, संतोख सिंह यांनी बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला.
आता या आरोपांवर संतोष सिंह यांनी प्रथमच स्पष्टीकरण दिले आहे. एका स्थानिक वाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले आहे की, जेव्हा या महिलेने तिच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे, तेव्हा आपण दिवसभर घरीच होतो. आपले संपूर्ण घर सीसीटीव्ही देखरेखीखाली असल्याचे सिंह यांनी म्हटले आहे, जे याचा पुरावा देखील आहे. यासह संतोख सिंह यांनी असेही सांगितले, ज्या ठिकाणी ही घटना घडली असे ही महिला म्हणत आहे तो परिसरही सीसीटीव्ही देखरेखीखाली आहे. (हेही वाचा: नवाजुद्दीन सिद्दीकी याला घटस्फोटाची नोटिस पाठवल्यानंतर पत्नी आलिया सिद्दीकीने Extra Marital Affair बाबत ट्वीटवर येत केला खुलासा)
लॉकडाऊनमुळे शहनाज आणि तिचा भाऊ शाहबाज मुंबईत अडकले आहेत. वडिलांवर झालेल्या आरोपांबाबत शाहबाजने स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत, पंजाब पोलिसांनी त्याच्या वडिलांविरूद्ध गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले, परंतु बलात्काराचा आरोप खोटा आहे असे तो म्हणाला. ज्या महिलेने हा आरोप केला आहे, तिला आपल्या वडिलांची प्रतिमा कलंकित करायची असल्याने तिने हे कृत्य केले असल्याचे शाहबाजचे म्हणणे आहे.