Bigg Boss 15: टीव्हीच्या आधी 6 आठवडे OTT वर प्रदर्शित होणार बिग बॉस 15; समोर आला नवा ट्विस्ट
यावेळी सिझनमध्ये सेलिब्रिटी जोडप्यांचादेखील समावेश असेल. यावेळचा मोठा ट्विस्ट म्हणजे 'जनता फॅक्टर'
दरवर्षी चाहते ‘बिग बॉस’शोची (Bigg Boss) आतुरतेने वाट पाहत असतात. आता देशातील सर्वाधिक लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. बिग बॉसचा 15 वा (Bigg Boss 15) सिझन येऊ घातला आहे. आता माहिती मिळत आहे की, रिअॅलिटी शो बिग बॉसचा हा नवा सिझन पहिल्यांदा ओटीटीवर (OTT) प्रदर्शित केला जाणार आहे आणि त्यानंतर हळूहळू तो टीव्हीवर शिफ्ट होईल. नवीन सीझनला 'बिग बॉस ओटीटी' म्हटले जाईल. या शोच्या टेलिव्हिजन प्रीमिअरच्या अगोदरच तो ओटीटी प्लॅटफॉर्म वूटवर (Voot) लाँच केला जाईल.
'बिग बॉस 15' हा टीव्हीच्या आधी 6 आठवडे ओटीटीवर प्रदर्शित होईल त्यानंतर तो कलर्स चॅनेलवर प्रसारित होईल. 'बिग बॉस 15' आता 3 ऐवजी 6 महिने चालेल.
यावेळी 'बिग बॉस 15' म्हणजेच 'बिग बॉस ओटीटी' मध्ये अनेक नामांकित सेलिब्रिटीसह सामान्य लोकही सहभागी होणार आहेत. यावेळी सिझनमध्ये सेलिब्रिटी जोडप्यांचादेखील समावेश असेल. यावेळचा मोठा ट्विस्ट म्हणजे 'जनता फॅक्टर' म्हणजेच सामान्य माणूस असणार आहे. यावेळी ‘बिग बॉस 15’ मध्ये येणार्या सामान्य लोकांना काही 'अनकॉमन पॉवर्स' देण्यात येणार आहेत, त्याद्वारे ते आपल्या आवडीच्या स्पर्धकांना निवडून शोमध्ये ठेवू शकतात. (हेही वाचा: Pavitra Rishta 2.0: सुशांतसिंह राजपूतनंतर आता Shaheer Sheikh साकारणार 'पवित्र रिश्ता 2'मध्ये मानवची भूमिका; डिजिटली होणार प्रसारण)
दरम्यान, बिग बॉस 15 साठी वरुण सूद, नेहा मर्दा, भूमिका चावला, पार्थ समथान, रिया चक्रवर्ती, सुरभि चंदना, दिशा वकानी, कृष्णा अभिषेक सारख्या स्टार्सच्या नावांबाबत चर्चा सुरु आहे. मात्र अजूनतरी कोणाचेही नाव फायनल झाले नाही. दुसरीकडे यंदाचा सिझन ओटीटीवर रिलीज होणार असल्याने हे 6 आठवडे होस्ट करण्यास सलमान खानने नकार दिला असल्याची माहितीही समोर आली आहे. सलमानऐवजी सिद्धार्थ शुक्ला हे 6 आठवडे होस्ट करू शकतो. मात्र याबाबतही कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.