विनोदाचा बादशाह भाऊ कदम ने पूर्ण केली वयाची पन्नाशी: कुटुंबियांसोबत साजरा केला वाढदिवस; पहा खास फोटो
विनोदाचा बादशाह भाऊ कदम याचा आज वाढदिवस असून त्याने वयाची पन्नाशी पूर्ण केली आहे. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून भाऊ कदम महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचला. सोमवारी भाऊच्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला त्याच्या कुटुंबियांनी आणि जवळच्या मित्रांसाठी त्याच्यासाठी खास सरप्राइज पार्टीचं आयोजन केलं होतं. भाऊच्या मित्रांनी अगदी ढोलताशांच्या गजरात त्याचा वाढदिवस साजरा केला.
विनोदाचा बादशाह भाऊ कदम (Bhau Kadam) याचा आज वाढदिवस (Birthday) असून त्याने वयाची पन्नाशी पूर्ण केली आहे. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातून भाऊ कदम महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचला. सोमवारी भाऊच्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला त्याच्या कुटुंबियांनी आणि जवळच्या मित्रांसाठी त्याच्यासाठी खास सरप्राइज पार्टीचं आयोजन केलं होतं. भाऊच्या मित्रांनी अगदी ढोलताशांच्या गजरात त्याचा वाढदिवस साजरा केला.
दिग्दर्शक रवी जाधव यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर भाऊच्या वाढदिवस पार्टीचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. या व्हिडिओला कॅप्शन देताना रवी जाधव यांनी 'असाच महाराष्ट्राला आनंद देत राहा मित्रा...' असं म्हटलंय. (हेही वाचा - Bigg Boss 13: लव्हबर्ड्स असीम रियाज आणि हिमांशी खुराना लवकरच झळकणार म्युझिक व्हिडिओमध्ये)
भाऊ कदम ने पूर्ण केली वयाची पन्नाशी असा साजरा केला वाढदिवस; पहा खास व्हिडिओ
View this post on Instagram
View this post on Instagram
Happy 50th Birthday dear Bhau Kadam!!! असाच महाराष्ट्राला आनंद देत रहा मित्रा 💐🎂
भाऊच्या वाढदिवसाला त्याच्या मित्रमंडळाची खास मैफिल जमली होती. यावेळी भाऊ कदम यांची पत्नी ममता तसेच त्यांच्या तीन मुली आणि एक मुलगा उपस्थित होता. भाऊ कदम हे व्यावसायिक मराठी चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये काम करत असतात.1991 मध्ये भाऊ कदम यांनी पहिल्यांदा नाटकात काम केले आणि तेथून त्यांची अभिनय कारकिर्द सुरु झाली. भाऊ कदम यांनी आतापर्यंत 9 पेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच 500 हून अधिक नाटकांत काम केले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 03, 2020 02:53 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

