भारती सिंग आणि पती हर्ष लिंबाचिया 'या' आजाराने ग्रस्त ; कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये केले दाखल
भारती आणि हर्षच्या आजारपणाची खबर कळताच चाहते त्यांच्या ठीक होण्याची प्रार्थना करत आहेत.
कॉमेडीयन भारती सिंग आणि पती हर्ष लिंबाचिया यांना डेंग्यू झाला असून त्यांना मुंबईच्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. वृत्तानुसार, हर्ष आणि भारती गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रक्त तपासणी केल्यानंतर प्लेटलेट्स कमी झाल्याचे आढळले. त्यानंतर दोघांनाही हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले.
भारती आणि हर्षच्या आजारपणाची खबर कळताच चाहते त्यांच्या ठीक होण्याची प्रार्थना करत आहेत.
सुरुवातीला भारती आणि हर्ष बिग बॉस 12 मध्ये सहभागी होतील, अशी चर्चा होती. शो ची घोषणा झाली तेव्हा या दोघांचेही नाव चांगलेच चर्चेत होते. त्याचबरोबर त्या दोघांना भारी भक्कम मानधन मिळणार असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. पण हे फक्त शो ची उत्सुकता वाढवण्यासाठी बोलले जात होते.