Amitabh Bachchan Post COVID-19 Inspirational Schedule: कोरोनावर मात केलेले अमिताभ बच्चन KBC 12 च्या शूटिंगसाठी पुन्हा सज्ज; शेड्युल थक्क करणारे!
दरम्यान बीग बींच्या पोस्टवर देखील अनेकांनी त्यांचा उत्साह वाखाण्याजोगा आहे.
बॉलिवूडचा शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) वयाच्या 77व्या वर्षी कोरोनावर (Coronavirus) मात पुन्हा कामामध्ये तितक्याच जोमाने परतला आहे. जुलै महिन्यात अमिताभ बच्चन यांना कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर उपचार घेऊन ऑगस्ट महिन्यात ते घरी परतले आणि आता त्यांनी चित्रपट आणि केबीसी 12 (KBC 12) च्या शुटिंगला सुरूवात केली आहे. दरम्यान सोशल मीडियावर त्यांनी टाकलेलं कामाचं शेड्युल तरूणांनाही लाजवेल इतके हेक्टिक आहे. पॅशन काय असते हे तुम्हांला अनुभवायचं असेल तर एकदा बीग बींच्या उत्साहाने बघून तुम्हांलाही नक्कीच या कोरोना व्हायरसच्या काळात काम करण्याची नवी उर्जा मिळू शकते.
ट्वीटर वर अमिताभ बच्चन यांनी दिलेल्या माहितीनुसार, ' पुन्हा कामाला सुरूवात करत आहे, 4 कॅम्पेन फिल्म्स, 5 आऊटफिट चेंजेस, 4 स्टील शूट्स, एका दिवसात 5 तास शूट.. असं वाटतय माझ्या व्यतिरिक्त सारेच दरोडा टाकायला तयार आहेत.. पुन्हा केबीसीच्या सेटवर परतण्यासाठी सज्ज' अशा आशयाचं त्यांचं ट्वीट आहे. दरम्यान कोविड 19 सारख्या आजाराशी सामना केलेले बीग बी काही काळ आराम करून घरीच राहतील असा अंदाज अनेकांनी लावला असेल पण बीग बींचा उत्साह 80 च्या उंबरठ्यावर पोहचलेले असतानादेखील तितकाच आहे. कोरोनावर मात करून घरी परतणाऱ्या महानायक अमिताभ बच्चन यांच्यासाठी अमूलने प्रसिद्ध केले 'हे' खास कॉमिक पोस्टर.
बीग बी अमिताभ बच्चन यांचे ट्वीट
दरम्यान केबीसी 12 चं शुटिंग़ 7 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. दरम्यान बीग बींच्या पोस्टवर देखील अनेकांनी त्यांचा उत्साह वाखाण्याजोगा आहे. आजारपणातून सावरलेल्या बीग बींनी दोन महिन्यात पुन्हा त्याच जोशात कामाला सुरूवात केल्याने त्यांनी प्रेरणादायी उर्जा सार्यांनाच दिली आहे.