Akanksha Dubey Death Case: आकांक्षा दुबेच्या कुटुंबीयांनी अभिनेत्रीचा प्रियकर समर सिंहवर लावला हत्येचा आरोप; गुन्हा दाखल

आकांक्षाची आई मधु दुबे यांनी तिच्या मुलीच्या मृत्यूसाठी अभिनेत्रीचा प्रियकर, अभिनेता-गायक समर सिंग आणि त्याचा भाऊ संजय सिंग यांना जबाबदार धरले आहे.

Akanksha Dubey (PC- Facebook)

Akanksha Dubey Death Case: वाराणसीतील एका हॉटेलच्या खोलीत रविवारी मॉडेल-अभिनेत्री आकांक्षा दुबे (Akanksha Dubey) मृतावस्थेत आढळून आली होती. त्यानंतर भोजपुरी गायक समर सिंग (Samar Singh) आणि त्याच्या भावाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सोमवारी एफआयआर नोंदवण्यात आला. 25 वर्षीय अभिनेत्री हॉटेलच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी ती वाराणसीत होती.

आकांक्षाची आई मधु दुबे यांनी तिच्या मुलीच्या मृत्यूसाठी अभिनेत्रीचा प्रियकर, अभिनेता-गायक समर सिंग आणि त्याचा भाऊ संजय सिंग यांना जबाबदार धरले आहे. त्यांच्याविरुद्ध उत्तर प्रदेशमध्ये आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा -Akanksha Dubey Last Video: भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेच्या आत्महत्येपूर्वीचं काही तास आधीचं रिलीज झालं होतं 'हे' गाणं; पहा व्हिडिओ)

समर अनेकदा आकांक्षाला मारायचा आणि तिचा छळ करायचा, असा आरोप आकांक्षाच्या आईने केला आहे. तिची मुलगी समरसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असल्याचेही तिने उघड केले आहे. खोलीतून कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही.

पवन सिंगसोबतचा तिचा नवीनतम म्युझिक व्हिडिओ रिलीज होण्याच्या काही तास आधी आकांक्षा मृतावस्थेत आढळून आली होती. AajTak च्या वृत्तानुसार, आकांक्षा 2018 मध्ये नैराश्याने ग्रस्त होती आणि तिने चित्रपटांमधून ब्रेक घेतला होता. तिने काही वर्षांनी पुनरागमन केले आणि कठीण टप्प्यात तिला साथ दिल्याचे श्रेय तिने तिच्या आईला दिले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝐀𝐤𝐚𝐧𝐤𝐬𝐡𝐚 𝐃𝐮𝐛𝐞𝐲 (@akankshadubey_official)

आकांक्षा भोजपुरी चित्रपटसृष्टीत खूप लोकप्रिय होती. तिने वयाच्या 17 व्या वर्षी मेरी जंग मेरा फैसला या चित्रपटातून पदार्पण केले. ती मुझे शादी करोगी (भोजपुरी), वीरों के वीर, फायटर किंग, कसम पैदा करना की 2 आणि इतर प्रोजेक्टमध्येही दिसली होती.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now