Actress Anupama Pathak Dies by Suicide: फेसबुक लाईव्हनंतर भोजपुरी अभिनेत्री अनुपमा पाठकची मुंबईमध्ये आत्महत्या; चार दिवसानंतर समोर आली बातमी

भारतामध्येही मुख्यत्वे टीव्ही, चित्रपट इंडस्ट्रीसाठी हे वर्ष काळवर्ष ठरले. आज सकाळी टीव्ही अभिनेता समीर शर्मा याच्या आत्महत्येची बातमी आली होती, आता टीव्ही मालिका आणि भोजपुरी चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री अनुपमा पाठक (Anupama Pathak) हिने वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या केल्याचे समजत आहे.

Anupama Pathak (Photo Credits: Instagram)

साल 2020 मध्ये जगाने अनेक मृत्यू पहिले. भारतामध्येही मुख्यत्वे टीव्ही, चित्रपट इंडस्ट्रीसाठी हे वर्ष काळवर्ष ठरले. आज सकाळी टीव्ही अभिनेता समीर शर्मा याच्या आत्महत्येची बातमी आली होती, आता टीव्ही मालिका आणि भोजपुरी चित्रपटांत काम करणारी अभिनेत्री अनुपमा पाठक (Anupama Pathak) हिने वैयक्तिक कारणांमुळे आत्महत्या केल्याचे समजत आहे. रविवारी, 2 ऑगस्ट रात्री अनुपमाने गळफास लावून आत्महत्या केली. एवढे मोठे पाऊल उचलण्यापूर्वी अनुपमाने एक सुसाइड नोटही सोडली असून, त्यात तिने फाशी घेण्याची कारणे दिली आहेत. अनुपमा मुंबईच्या दहिसर चौकीवर असलेल्या ठाकूर मॉलजवळील एमएमआरडीए इमारतीत भाड्याच्या घरात राहत होती.

रविवारी रात्री फाशी घेण्यापूर्वी अनुपमाने फेसबुक लाईव्ह केले होते. यामध्ये तिने आर्थिक समस्येमुळे आत्महत्या करत असल्याचे सांगितले आहे. यासाठी दिलेल्या पहिल्या कारणाबाबत ती म्हणते, ‘मनीष झा नावाच्या व्यक्तीने लॉकडाऊन दरम्यान मे महिन्यात आपली दुचाकी घेतली होते. त्यावेळी आपण आपल्या गावी होते. मात्र आपण मुंबईमध्ये परत आल्यावर मनीषने ती गाडी परत देण्यास नकार दिला.’

दुसरे कारण देताना ती म्हणते, ‘डिसेंबर 2019 मध्ये एका प्रॉडक्शन कंपनीत आपण 10 हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये हे पैसे व्याजासहित परत येणे होते. मात्र त्याबाबत आपली फसवणूक झाली व हे पैसे मिळाले नाहीत.’ (हेही वाचा: सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात CBI ने रिया चक्रवर्ती, तिचे वडील, आई, भाऊ, मॅनेजरसह इतरांविरुद्ध FIR दाखल केला)

याबाबत काशिमीरा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पीआय संजय हजारे म्हणाले, ‘आम्ही या प्रकरणाचा तपास करीत आहोत. मात्र सर्व वस्तुस्थितीचा तपास पूर्ण झाल्यानंतरच दोषींवर कारवाई केली जाईल.’ दरम्यान, यापूर्वी कुशल पंजाबी, सेजल शर्मा, सुशांतसिंह राजपूत, समीर शर्मा आणि मनमीत ग्रेवाल अशा कलाकारांनी आत्महत्या केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif