महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या करण ओबेरॉय याला जामीन मंजूर
त्यानंतर एक महिना त्याला तुरुंगात ठेवण्यात आले होते.
महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अभिनेता करण ओबेरॉय (Karan Oberoi) याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर एक महिना त्याला तुरुंगात ठेवण्यात आले होते. मात्र अखेर शुक्रवारी करण ओबेरॉय याला हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसेच पीडित महिलेवर हल्ला करण्यात आला असल्याचा आरोपसुद्धा लगावण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे.
यापूर्वी करण याच्या वकिलांनी कोर्टात असे म्हटले होते की, पीडित महिला आणि करण या दोघांमध्ये आपल्या मर्जीनुसार नातेसंबंध होते. तर करण याने टिव्हीवरील काही जाहिरातींमध्ये काम केले आहे. यापूर्वी करण याने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. परंतु सत्र न्यायालयाने त्याचा अर्ज जामिनासाठी फेटाळून लावला होता.
(मुंबई: बलात्कार प्रकरणी अटकेत असलेल्या अभिनेता करण ओबेरॉय याचा जामीन अर्ज फेटाळला)
तर करणवर बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. तसेच बलात्काराचा व्हिडिओ बनवून करण आपल्याला धमकावत असल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले होते.त्यानुसार करण याच्यावर कारवाई करण्यात आली होती.