ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे निधन; वयाच्या 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

दूरदर्शनवरील 'गप्पागोष्टी' ही त्यांची मालिका प्रचंड गाजली. नाटक, सिनेमा, टीव्ही मालिका आणि आकाशवाणी या चारही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली.

Raja Mayekar (Photo Credits: YouTube)

'लोकनाट्याचा राजा' म्हणून किताब पटकाविणारे ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर (Raja Mayekar) यांचे आज राहत्या घरी निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. आपल्या दमदार अभिनयाने तब्बल 60 वर्षे अभिनय क्षेत्र गाजवणारे राजा मयेकर यांची आज मुंबईच्या राहत्या घरी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास प्राणज्योत मालविली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला. वयाच्या 15 व्या वर्षापासून त्यांनी रंगभूमीवर काम करायला सुरुवात केली होती. दशावतारी नाटकापासून राजा मयेकर यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला.

दूरदर्शनवरील 'गप्पागोष्टी' ही त्यांची मालिका प्रचंड गाजली. नाटक, सिनेमा, टीव्ही मालिका आणि आकाशवाणी या चारही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

हिंदमाता येथील स्मशानभूमीत आज सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. शाहीर साबळे यांच्यामुळं राजा मयेकर हे अभिनयाच्या क्षेत्रात आले. मुंबईत राहायला आल्यानंतर चाळीतील एका गृहस्थांकडं शाहीर साबळे यायचे. या चाळीत देशावरच्या कुटुंबांची बिऱ्हाडं जास्त होती. त्यांची बोलण्याची ढबही देशावरचीच होती. या सगळ्यांच्या तुलनेत राजा मयेकर यांचं मराठी खूपच शुद्ध होतं. ते शाहिरांना आवडायचं.

कलाक्षेत्र आणि भाषा यावर त्या दोघांचं विशेष प्रेम होतं. त्यामुळं वाण्याच्या चाळीत राहायला आल्यावर शाहिरांनी कृष्णकांत दळवी, राजा मयेकर अशा सहकाऱ्यांच्या साथीनं ‘शाहीर साबळे आणि पार्टी’ची स्थापना केली. ‘आंधळं दळतंय’, ‘यमराज्यात एक रात्र’ आणि ‘असुनी खास घरचा मालक’ ही तीन लोकनाट्य तुफान गाजली होती. शिवाय ‘बापाचा बाप’, ‘नशीब फुटकं सांधून घ्या’, ‘कोयना स्वयंवर’ या नाटकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अशा या हरहुन्नरी कलाकाराला लेटेस्टली मराठी कडून कोटी कोटी प्रणाम

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement