Sushmita Sen: ब्रेकअपनंतर सुष्मिता सेनने शेअर केली पहिली पोस्ट, लिहिले- ‘Peace is Beautiful’

ही पोस्ट पाहता, दोघांमध्ये सर्व काही ठीक नव्हते असा अंदाज बांधता येतो. तिच्या सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, शांती सर्वात सुंदर आहे. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करते.

Sushmita Sen & Rohman Shawl (Photo Credit - Twitter)

बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेत्रीने तिचा प्रियकर रोहमन शॉलसोबत (Rohman Shawl)  ब्रेकअप केले आहे. दोघांनी अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांवरील प्रेम व्यक्त केले. सुष्मिता आणि रोहमन सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले. सुष्मिताने तिच्या ब्रेकअपची माहिती सोशल मीडियावर दिली होती. ब्रेकअपनंतर सुष्मिताने पहिली पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट पाहता, दोघांमध्ये सर्व काही ठीक नव्हते असा अंदाज बांधता येतो. तिच्या सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, शांती सर्वात सुंदर आहे. मी तुम्हा सर्वांवर प्रेम करते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

 

सुष्मिताने तिच्या इंस्टाग्रामवर स्वतःचा आणि रोहमनचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “आमच्या नात्याची सुरुवात मैत्रीपासून झाली, आम्ही मित्रच राहिलो, हे नाते खूप पूर्वी संपले…. आता प्रेम कायम राहिल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sushmita Sen (@sushmitasen47)

सुष्मिता आणि रोहमन यांची पहिली भेट सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. रोहमनने सर्वप्रथम अभिनेत्रीला मेसेज केला होता. यानंतर दोघेही एका शोमध्ये भेटले. पहिल्या भेटीत सुष्मिता रोहमनवर इम्प्रेस झाली आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. वर्क फ्रंटवर सुष्मिता सेन नुकतीच 'आर्य 2' मध्ये दिसली होती. अभिनेत्रीच्या दमदार अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले. (हे ही वाचा राम गोपाल वर्माची अभिनेत्री Pooja Bhalekar च्या लाल बिकनी मधील बीच वरील हॉट अंदाजातील सेक्सी फोटो!.)

सुष्मिता सेन ही सिंगल मदर आहे. तिने अलिशा आणि रेनी नावाच्या दोन मुलींना दत्तक घेतलं आहे. सुष्मिता सेनला 1994 साली मिस युनिव्हर्सचा पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर दस्तक या चित्रपटाच्या माध्यमातून तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. तिने अनेक हिट बॉलिवूड चित्रपट दिले आहेत.