अक्षयच्या 'Sooryavanshi'चा शेवट Singham च्या 'आता माझी सटकली' आणि Simmba च्या 'आला रे आला सिम्बा' ने होणार?
त्यामुळे आता चित्रपटगृहात पुन्हा एकदा 'आता माझी सटकली' आणि 'आला रे आला, सिम्बा आला' प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे
अक्षय कुमारच्या 'सूर्यवंशी' चा शेवट 'सिंघम'च्या आणि 'सिम्बा'च्या एन्ट्रीने होणार आहे. त्यामुळे आता चित्रपटगृहात पुन्हा एकदा 'आता माझी सटकली' आणि 'आला रे आला, सिम्बा आला' प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
सूर्यवंशीचा फर्स्ट लुक रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. त्याचं कारण आहे, त्यामध्ये दिसणारं अक्षय कुमार (Akshay Kumar), अजय देवगण (Ajay Devgn) आणि रणवीर सिंहचं (Ranveer Singh) त्रिकुट. चित्रपटामध्ये सिंघम आणि सिम्बा सुद्धा एन्ट्री घेणार असल्याचं जाहीर झालं आणि प्रेक्षकांच्या आनंदाला पारावार राहिला नाही.
रोहित शेट्टीच्या पोलिसी दुनियेतील हा तिसरा सिनेमा. 2011 ला अजय देवगणचा सिंघम आला आणि प्रेक्षकांनी त्याला प्रचंड डोक्यावर घेतलं. त्या सिनेमा मधले काही संवाद तर आजही तितकेच प्रसिद्ध आहेत. त्यानंतर मागच्या वर्षी आलेल्या सिम्बाला सुद्धा भरघोस प्रतिसाद मिळाला. रणवीरचा पोलीस सगळ्यांनाच आवडला. त्या सिनेमात सिंघमने क्लायमॅक्सला एन्ट्री घेऊन टाळ्या शिट्ट्यांचा वर्षाव करून घेतला. आता जेव्हा सिनेमाच्या शेवटी अक्षय कुमार, अजय देवगण आणि रणवीर सिंह हे तिघंही पोलिसांच्या वेशात खलनायकासमोर उभे ठाकतील, तेव्हा सिनेमागृहात काय माहौल बनतोय हे प्रत्यक्ष जाऊन अनुभवण्यातच मजा आहे. (हेही वाचा. Sooryavanshi: अॅक्शन सीन संपताच अक्षय कुमार ने आपल्या प्रशिक्षकावर रोखली बंदूक, पाहा मजेशीर फोटो)
चित्रपटामध्ये अक्षय कुमार दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखाची भूमिका साकारत असून सोबतच कॅटरिना कैफही मुख्य भूमिकेत असणार आहे. तर अभिमन्यू सिंह हा खलनायकाची पात्र करणार आहे. पुढल्या वर्षी 27 मार्च ला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.