ICC World Cup 2019: भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यानंतर तैमुर नेही केलं सेलिब्रेशन; फोटो व्हायरल
त्यानेही मॅन्चेस्टरमध्ये रंग़लेल्या भारत -पाक सामन्याचा आनंद घेतला.
क्रिकेटच्या मैदानातील कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरूद्ध पाकिस्तान सामना यंदाच्या वर्ल्डकप 2019च्या साखळी सामन्यात रंगला. आबालवृद्धांमध्ये या सामन्याचं खास आकर्षण होतं. काही भारतीय फॅन्स भारतामधून थेट मॅन्चेस्टला पोहचले. इंग्लंडमध्ये वर्ल्डकपचा हा सामना पाहण्यासाठी अनेक सामान्य नागरिकांसोबत बॉलिवूड सेलिब्रिटी आणि माजी खेळाडू दाखल झाले होते. पावसाचा व्यत्यय आल्याने डकवर्थ लुईस नियमानुसार पाकिस्तानवर भारताने मात केली आणि इंग्लंडसह भारताच्या गल्ल्यांमध्ये सेलिब्रेशनला सुरूवात झाली. यामध्ये तैमुरनेही सहभाग घेतला. IND vs PAK, ICC World Cup 2019: भारताचा पाकिस्तानवर एकतर्फी विजय, 89 धावांनी उडवला धुव्वा
टीम इंडियाची जर्सी घातलेल्या तैमुरचा फोटो सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. सध्या करिना कपूर आणि सैफ अली खानसोबत तैमूर इंग्लंडमध्ये आहे. सैफने भारत-पाक सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये हजेरी लावली होती.
वारंवार पावसाच्या सरी बरसत असल्याने उशिरा यंदाच्या भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यादरम्यान भारताने 89 धावांनी विजय मिळवला.