रोमँटिक हिरोची छाप बसलेल्या Swwapnil Joshi चा एक अनोखा प्रयोग; नव्या चित्रपटाची केली घोषणा
या चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल फुरिया याने केले आहे
एखाद्या व्यक्तीची एखादी खासियतच नंतर तिची मर्यादा ठरू शकते. स्वनिल जोशीच्या (Swwapnil Joshi) बाबतीतीही असंच झालं. मराठीमधील 'चॉकलेट बॉय' नावलौकिक मिळाल्यानतर त्याच धाटणीच्या भूमिका त्याला मिळत गेल्या. एक उत्तम कलाकार असल्या कारणाने त्याने त्या सुंदर निभावल्याही. पण शेवटी कुठल्याही कलाकाराला जर काही आव्हान नसेल, तर मग काम करण्याची उर्मी कमी होत जाते. आणि हे होऊ नये म्हणूनच स्वप्नीलने जाणीवपूर्वकपणे गेल्या काही वर्षांपासून आपला ट्रॅक बदलला आहे.
'फुगे' मधली काहीशी 'वेगळी' भूमिका, 'रणांगण' मधली ग्रे शेड असलेली भूमिका ते अगदी आटा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतलेल्या 'जिवलगा' मधील खलनायक अशा वैविध्यपूर्ण भूनिक त्याने साकारल्या. आता त्याच्या या यादीत अजून एका कलाकृतीची भर पडते आहे. नुकतच त्याने आपल्या 'बळी' या आगामी चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर शेयर केलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विशाल फुरिया याने केले आहे. त्याचा हा दुसरा चित्रपट असणार आहे. याआधी त्याने पूजा सावंतच्या 'लपाछपी'चं दिग्दर्शन केलं होतं. तोसुद्धा हॉररपॅट होता. हासुद्धा त्याच धाटणीचा असल्याची शक्यता आहे. (हेही वाचा. अजय गोगावले यांच्या आवाजातलं एक काळजाला भिडणारं गाणं म्हणजे ‘सुंदरा’; पहा ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ चित्रपतील या गाण्याची खास झलक)
'रक्ताच्या थारोळ्यातून उभा राहणार बळी' असे कॅप्शन असलेल्या या पोस्टर मध्ये एक 'क्रॉस' सदृश्य सुरा रक्ताळलेल्या अवस्थेत दिसत आहे. या निमित्ताने स्वप्नील प्रथमच 'हॉरर' चित्रपट करत आहे. हा चित्रपट 2020 साली प्रदर्शित होणार आहे. याची निर्मिती अर्जुन बरण आणि कार्तिक निशानदार करणार आहेत. आता स्वप्नीलचा हा प्रयोग प्रेक्षकांना किती भावतो आणि किती यशस्वी होतो हे पाहणं औत्सुयाचं ठरेल.