Sushant Singh Rajput Commit Suicide: सुशांत सिंह राजपूत याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'ही' होती शेवटची पोस्ट
यावरून तो नैराश्यात गेल्याचे दिसत आहे.
2020 वर्ष बॉलिवूड साठी किती वाईट चालू आहे याची प्रचिती आज घडलेल्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येवरून येत आहे. प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या सुशांत सिंह राजपूतने आपल्या वांद्रयाच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या या आत्महत्येने बॉलिवूड विश्वात शोककळा पसरली असून त्याच्या सर्व चाहत्यांना देखील जबर धक्का बसला आहे. त्याने आत्महत्या का केली हा प्रश्नच अनेकांना बुचकळ्यात पाडणारा आहे. करिअर बाबतीत सुशांतची यशस्वी घोडदौड सुरु असताना त्याने इतके टोकाचे पाऊल का उचचले हा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्याच्या आत्महत्येपूर्वी त्याने 3 जूनला शेवटचे इन्स्टाग्रामवर शेवटचे पोस्ट केली होती.
या पोस्ट मध्ये त्याने आपल्या स्वर्गवासी आईचा जुना फोटो शेअर करुन भावनिक पोस्ट केली होती. यावरून तो नैराश्यात गेल्याचे दिसत आहे. Sushant Singh Rajput Suicide: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या
या पोस्ट मध्ये तो आपल्या आईला खूप मिस करतोय हे सांगितले आहे. जीवन हे किती क्षणभंगूर असतं असेही त्याने म्हटले आहे. सुशांतने आपल्या वांद्रयाच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. सुशांतच्या नोकराने ही माहिती पोलिसांना देताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.