Sushant Singh Rajput Birth Anniversary: पवित्रा रिश्ता ते एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी, दिल बेचारा या 5 कलाकृतींमधील सुशांत सिंह राजपूत च्या भूमिका आजही रसिकांच्या मनावर करतात राज्य!

सुशांतसिंह राजपूतच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस थोडा वेगळा असेल. पण त्याच्या कलाकृतींमधून आज तो आपल्याबरोबर आहे ही भावना मनात ठेवून जर त्यांच्या स्मृतींना उजाळा देणार असाल तर याची तुम्हांला नक्कीच आठवण होणारच!

Sushant Singh Rajput | (Photo Credits: Facebook)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput ) हे नावं जेव्हा जेव्हा समोर येतं तेव्हा आजही अनेकांना त्याची अकाली एक्झिट मनाला विषण्ण करून जाते. 14 जून 2020 ला त्याचा जीवनप्र्वास संपला. पवित्र रिश्ता या मालिकेपासून अगदी त्यांच्या मृत्यू नंतर रिलीज झालेला त्याचा 'दिल बेचारा' हा सिनेमा असा त्याचा प्रवास पाहिला तर तो सिनेसृष्टीमध्ये कोणताही गॉडफादर नसताना एका सामान्य मुलाचा प्रवास अभिमानास्पद आहे. वरवर पाहता हे यश सोप्प वाटत असलं तरीही ते सहज मिळलेलं यश नव्हतं. त्याने स्टगल करूनच हे यश मिळवलं आहे. दरम्यान आज सुशांत असता तर तो त्याचा 35 वा वाढदिवस (Sushant Singh Rajput Birthday) साजरा करत असता.

सुशांतसिंह राजपूतच्या चाहत्यांसाठी आजचा दिवस थोडा वेगळा असेल. पण त्याच्या कलाकृतींमधून आज तो आपल्याबरोबर आहे ही भावना मनात ठेवून जर त्यांच्या स्मृतींना उजाळा देणार असाल तर याची तुम्हांला नक्कीच आठवण होणारच! Suicide or Murder? या टायटलने सुशांत सिंह राजपूत याच्या जीवनप्रवासावर बनणार सिनेमा; पहा सिनेमाचे First Poster.

पवित्र रिश्ता

पहिल्यांदा सुशांतसिंह राजपूत हे नाव सार्‍यांना ठाऊक झालं ते पवित्र रिश्ता या मालिकेतून. या मालिकेत त्यानं मानव ची भूमिका केली होती. अंकिता लोखंडे सोबत त्यांची जोडी नंतर ऑनस्क्रिन आणि ऑफ स्क्रिन देखील गाजली.

काय पो चे

पवित्र रिश्ता नंतर सुशांतला बॉलिवूड खुणावत होतं. त्यानं अभिषेक कपूर काय पो चे या हिंदी सिनेमामध्ये काम केले. आणि इथूनच त्याला हिंदी सिनेजगतात अनेक बड्या कलाकारांसोबत, दिग्दर्शकांसोबत काम करण्यासाठी संधी मिळत गेली.

एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी

भारताचा 'कूल कॅप्टन' अशी ओळख असणार्‍या महेंद्र सिंह धोनीच्या आयुष्यावर 'एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी' हा सिनेमा आधारित आहे. यामध्ये धोनीच्या प्रमुख भूमिकेत सुशांत होता. त्याने धोनीच्या अगदी जवळ जाणारी भूमिका ऑन स्क्रिन साकारल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता.

छिछोरे

सुशांत सिंह रजपूत आणि छिछोरे या सिनेमाचं एक वेगळंच गणित आहे. अनेकांना आता हा सिनेमा भावूक करून जाणारा असेल. या सिनेमात त्याने कॉलेजवयीन मुलगा आणि वडील अशा दोन आयुष्याच्या वळणावरच्या भूमिका साकारल्या आहेत. RIP Sushant Sing Rajput: छिछोरे सिनेमात अखेरचा झळकला होता सुशांत सिंह राजपूत; पहा आत्महत्याग्रस्त मुलाला प्रेरणा देणारा हा त्याचा हृदयस्पर्शी सीन (Watch Video).

दिल बेचारा

दिल बेचारा हा सुशांत सिंह रजपूतचा शेवटचा सिनेमा होता. त्याच्या मृत्यू पश्चात तो रीलीज झाला आहे. 'द फॉल्ट्स इन अवर स्टार्स' या कादंबरीवर तो आधारित आहे. दरम्यान ओटिटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करून त्याला आदरांजली अर्पण करण्यात आली होती.

दरम्यान आता सुशांतसिंह राजपूतचे हे चित्रपट नेटफ्लिक्स, डिसनी हॉट्स्टार किंवा अमेझॉण प्राईम किंवा युट्युब वर देखील सहज पहायला मिळू शकतात. स्वतः विविध भूमिकांमध्ये कलाकार म्हणून टाकून घडू पाहणारा एक उमदा स्टार काही महिन्यांपूर्वी या जगाला अलविदा म्हणून निघून गेला. पण त्याच्या खास चाहत्यांच्या मनात त्याची जागा अशीच कायम असेल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now