अभिनेता सुशांत सिंह राजपूत च्या अकाली निधनाच्या धक्क्याने वहिनी सुधा देवी यांचा मृत्यू

सुशांतच्या अकाली निधनाचा त्यांच्या मनाने स्वीकारच केला नव्हता.

Sushant Singh Rajput Funeral । Photo Credits: Facebook

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर आता दोन दिवसातच त्याच्या कुटुंबाला आता दुसरा झटका बसला आहे. 14 जून दिवशी सुशांतने मुंबईमध्ये राहत्या घरी गळफास घेऊस आपलं जीवन संपवल्यानंतर आता याच बातमीच्या धक्क्याने सुशांतची वहिनी सुधा देवी (Sudha Devi) यांचं देखील निधन झालं आहे. सुशांतच्या अकाली निधनाचा त्यांच्या मनाने स्वीकारच केला नव्हता. Sushant Singh Rajput Suicide: सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडकरांवर भडकली कंगना रनौत; 'ही आत्महत्या नव्हती, तर ठरवून केलेला खून होता' (Watch Video).

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, सुधा देवी यांचे निधन बिहारमधील त्यांच्या घरी पुर्णिया येथे झाले आहे. मुंबईमध्ये सुशांतवर अंतिम संस्कार सुरू असतानाच सुधा देवी यांनी अखेरचा श्वास घेतला. सुशांतच्या निधनाचं वृत्त समजल्यानंतर त्यांनी अन्न पाण्याचादेखील त्याग केला होता. सुशांतचा मृत्यू स्वीकरणं कठीण झालेल्या त्यांच्या कुटुंबाला आता सुधा देवीच्या जाण्याने दुसरा जबर धक्का बसला आहे.

सुशांतसिंह राजपूत मागील काही महिन्यांपासून नैराश्यामध्ये त्यामधूनच त्याने हे टोकाचं पाऊल उचललं असावं हा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान त्याचा मृत्यू श्वास कोंडल्यामुळेच झाला असे त्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये आहे. मात्र उत्तम आर्थिक स्थिती आणि फिल्मी करियरमध्ये यशस्वी असलेल्या सुशांतला नेमकं कशाचं डिप्रेशन आलं होतं? हा प्रश्न अनुत्तरित आहे. आता त्याच्या आत्महत्येचा पोलिस तपास सुरू आहे.

सुशांत सिंह राजपूत याच्यावर विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले त्यावेळेस राजपूत कुटुंबासह बॉलिवूडमधील काही कलाकार सहभागी होते.