नाशिक: सलमान खानच्या चाहत्याचा पराक्रम; 'भारत'साठी बुक केले संपूर्ण थिएटर
5 जून रोजी प्रदर्शित प्रदर्शित होणार आहे, हा चित्रपट एकट्याने पाहता यावा म्हणून एका चाहत्याने संपूर्ण थिएटरच बुक केले आहे.
ऐश्वर्या रायच्या पकारणानंतर सलमान खानचे आयुष्य पूर्णतः बदलून गेले. त्यानंतर आलेल्या 'तेरे नाम' चित्रपटानंतर त्याची लोकप्रियता अजूनच वाढू लागली. आता सलमान खान वर्षाला एकच चित्रपट करतो, मात्र हाच एक चित्रपट यशाचे सर्व रेकॉर्ड मोडतो. आताही सलमान खानचा असाच एक चित्रपट येऊ घातलाय 'भारत' (Bharat). या चित्रपटाचा ट्रेलर, सलमानचा लुक, गाणी अशा सर्वच गोष्टींना प्रेक्षकांनी आणि सलमानच्या चाहत्यांनी डोक्यावर घेतलय. 5 जून रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट, एकट्याने पाहता यावा म्हणून एका चाहत्याने संपूर्ण थिएटरच बुक केले आहे.
आशिष सिंघल असे या चाहत्याचे नाव असून तो नाशिकचा रहिवासी आहे. आशिष सलमानचा फार मोठा चाहता आहे. त्याने सलमानचे सर्वच चित्रपट अनेकवेळा पहिले आहेत. सलमानचा 'भारत' हा फार महत्वाकांक्षी चित्रपटआहे, त्यात यामध्ये सलमान 5 वेगवेगळ्या रुपात दिसणार आहे. ही गोष्ट आशिषसाठी फार मोठी ट्रीट असणार आहे. हा चित्रपट आपल्याला कोणत्याही व्यत्ययाशिवाय एकट्याने पाहता यावा, म्हणून त्याने संपूर्ण थिएटर बुक केले आहे. (हेही वाचा: कतरिना कैफ हिचा साडीमधील हॉट लूक पाहून सलमान खान एकटक पाहतच राहिला)
दरम्यान या चित्रपटात सलमान खानसह कैतरिना कैफ, तब्बू, दिशा पटाणी, सुनील ग्रोवर आणि जॅकी श्रॉफ असे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. अली अब्बास जाफरी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आधी या चित्रपटासाठी प्रियंकाला विचारण्यात आले होते, मात्र तिने नकार दिल्याने यामध्ये कैतरिनाची वर्णी लागली.