सखी गोखले - सुव्रत जोशी यांचं नवं कपल गोल; दोघांनीही गोंदवला सारखाच टॅटू!

सखी आणि सुव्रतने सारखाच टॅटू बनवून घेतला आहे.नक्षत्र, दिवस- रात्र, युनिव्हर्स यांचं प्रतिक असणारा टॅटू सुव्रतने त्याच्या हातावर तर सखीने मानेवर गोंदवला आहे.

Sakhi-Suvrat Joshi | Photo Credits: Instagram

दिल दोस्ती दुनियादारी या सुपरहीट मराठी मालिकेतून रसिकांच्या भेटीला आलेली सखी गोखले आणि सुव्रत जोशी ही सुपरहीट जोडी वर्षभरापूर्वी लग्नबंधनात अडकली. सध्या लंडनमध्ये उच्च शिक्षण घेत असल्याने सखी आणि सुव्रत लॉंग डिस्टंट रिलेशनशीपमध्ये आहेत. मात्र सोशल मीडीयामध्ये त्यांचे फोटो पाहून अनेकांना कपल गोल्स मिळतात. सध्या ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये भारतात आलेल्या सखीने आता नवा टॅटू गोंदवला आहे. सखी आणि सुव्रतने सारखाच टॅटू बनवून घेतला आहे.

नक्षत्र, दिवस- रात्र, युनिव्हर्स यांचं प्रतिक असणारा टॅटू सुव्रतने त्याच्या हातावर तर सखीने मानेवर गोंदवला आहे. त्याचे खास फोटो दोघांनीही इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

सखी-सुव्रतचा टॅटू

 

View this post on Instagram

 

Constellations Mind & Matter Day & Night The Universe Inked ‘19 Big hugs to @aadesh_g at @ironbuzztattoos who never fails to impress :)

A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg) on

सखीला टॅटूची आवड असल्याचं तिने यापूर्वी काही मुलाखतीमध्ये सांगितलं होतं. सखीच्या हातावर तिच्या शाळेतून दिसणार्‍या पर्वतरांगांचं, सखीची आई शुभांगी गोखले यांचं नाव आहे. सोबतच फुलपाखरू असे चार टॅटू आहेत.

सखी-सुव्रत एप्रिल 2018 मध्ये विवाहबंधनात अडकले. त्यानंतर शिक्षणासाठी ती लंडनला रवाना झाली. दरम्यान सुव्रत अधुन मधून तिला भेट देण्यासाठी लंडनला रवाना झाला होता त्याचेही फोटो त्यांनी शेअर केले होते. सखी-सुव्रत यांनी दिल दोस्ती दुनियादारी, दिल दोस्ती दोबारा या मालिकेत तर अमर फोटो स्टुडिओ या नाटकातून ही जोडी रसिकांच्या मनात खास जागा करून गेली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now