Sacred Games 2 नेटफ्लिक्स पूर्वी One Plus च्या युजर्सना पाहता येणार; 14 ऑगस्टला मुंबईत खास स्क्रिनिंग़

त्यासाठी खास रजिस्ट्रेशन खुलं करण्यात आलं असून निवडक लोकांना उद्या हा शो पाहता येणार आहे.

सेक्रेट गेम्स 2 टीझर Photo Credits youtube

नेटफ्लिक्स इंडियाच्या (Netflix India) बहुचर्चित सेक्रेड गेम्स 2 (Sacred Games) या वेबसीरीजला सुरूवात होणार आहे. सैफ अली खान, नवाझुद्दीन यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या वेब सीरीजचं काऊंटडाऊन आता सुरू झालं आहे. 15 ऑगस्ट पासून सेक्रेड गेम्स 2 नेटफ्लिक्सवर पाहता येणार असली तरीही वन प्लसच्या (One Plus) युजर्सना एक दिवस आधीच हा शो पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. त्यासाठी खास रजिस्ट्रेशन खुलं करण्यात आलं असून निवडक लोकांना उद्या हा शो पाहता येणार आहे.

मुंबई सह बेंगळूरू, दिल्ली मध्ये सेक्रेड गेम्स 2 साठी खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आलं आहे. प्रेक्षकांना या शोचा दिग्दर्शक अनुराग कश्यप सोबत खास स्क्रिनिंग पाहता येणार आहे. मुंबईत लोअर परेल येथील फिनिक्स मॉलमधील PVR मध्ये संध्याकाळी 7 वाजता खास शोचं आयोजन करण्यात आलं आहे.   आतापर्यंतचा सर्वात स्वस्त असा 199 रुपयांचा प्लॅन  नेटफ्लिक्सने भारतात लाँच केला आहे. हा प्लॅन खास मोबाईल यूजर्ससाठी लाँच करण्यात आला आहे.  Sacred Games 2 Trailer  पहा.

One Plus Tweet 

Registrations for the Sacred Games S2 Special Screenings are live now and free for the OnePlus community!

Mumbai 🎥 https://t.co/VAZ23izZMZ

Delhi 🎥 https://t.co/DWBcQ5y0z1

Bengaluru 🎥 https://t.co/tGyRnpXQtd

Know more on OnePlus Forums 👉 https://t.co/hO4vpk2typ pic.twitter.com/NJES33b73v

— OnePlus India (@OnePlus_IN) August 10, 2019

‘जंग का वक्त आ गया है’म्हणत गणेश गायतोंडे पुन्हा एकदा सरताज सिंगला आव्हान देत असल्याचं नव्या प्रोमोमध्ये पहायला मिळालं आहे. नव्या सीझनमध्ये कल्की कोचिन आणि रणवीर शौरी देखील महत्त्वाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. तर यंदा अमृता सुभाष या मराठमोळ्या अभिनेत्रीचीही वर्णी लागली आहे. सेक्रेड गेम्सच्या पहिल्या भागात काटेकर या पोलिस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत असलेला जितेंद्र जोशी आणि त्याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसलेली नेहा शितोळेच्या कामाची वाहवा झाली.