मुलांसह रितेश देशमुख घालतोय 'बाला बाला' या गाण्यावर धिंगाणा, पाहा संपूर्ण व्हिडिओ
या चित्रपटातील 'बाला बाला' (Bala Bala) या गाण्याने तर सर्वांनाच वेड लावले आहे. सध्या या गाण्यावरील डान्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या हाऊसफूल 4 (Housefull 4) या चित्रपटाने प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावले आहे. या चित्रपटातील 'बाला बाला' (Bala Bala) या गाण्याने तर सर्वांनाच वेड लावले आहे. सध्या या गाण्यावरील डान्सने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हाऊसफूल 4 चित्रपटाचा मुख्य कलाकार अक्षय कुमार नेहमीच त्याच्या नव्या अंदाजाने चाहत्यांनी आकर्षित करत असतो. बाला बाला या गाण्यावरील डान्सने यात आणखी भर घातली आहे. याच गाण्यावर डान्स करत रितेश देशमुख (Riteish Deshmukh) यानेही अक्षय कुमारने दिलेली चॅलेंज स्वीकारली आहे. रितेशने त्याच्या मुलांसह बालाबाला या गाण्यावर डान्स करुन तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यानंतर रितेश देशमुखच्या या व्हिडिओला अनेकांनी पसंती दाखवली आहे.
हाऊसफूल 4 हा चित्रपट प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा टप्पा गाठला आहे, असे रितेश देशमुख याने त्याच्या ट्विटमध्ये पोस्ट केले आहे. यामुळे त्याने आपल्या मुलांसह हाऊसफूल 4 मधील 'बाला बाला' गाण्यावर डान्स करत आनंद व्यक्त करत आहे. हे देखील वाचा- Rahul Gandhi चं नाव घेणं टाळलं आणि मग त्यांना गमवावे लागले लाखो रुपये; वाचा सविस्तर
रितेश देशमुख याचे ट्विट-
हाऊसफूल 4 चित्रपट प्रदर्शित होऊन अनेक दिवस उलटली असून प्रेक्षक मोठ्या संख्येने हा चित्रपट पाहण्यासाठी जात आहेत.