पाकिस्तानी अभिनेत्री अजेया खान आणि पती दानिश तैमूर सुखरुप; PIA विमान अपघातात मृत्यू झाल्याच्या अफवांनंतर अभिनेत्रीने केला खुलासा
परंतु, ते दोघेही सुखरुप असल्याचे सत्य आता समोर आले आहे.
पाकिस्तान मध्ये काल (22 मे) दुपारी झालेल्या PIA विमान अपघातात पाकिस्तानी अभिनेत्री अयेजा खान (Ayeza Khan) आणि पती डॅनिश तैमूर (Danish Taimoor) यांचा बळींमध्ये समावेश होता, अशी माहिती काही रिपोर्ट्सद्वारे समोर आली होती. परंतु, ते दोघेही सुखरुप असल्याचे सत्य आता समोर आले आहे. विमान अपघातात अभिनेत्री अयेजा खान हिचा पतीसह मृत्यू झाला अशी बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरु लागली. त्यानंतर अजेया खान हिने इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करत या सर्व अफवांना पूर्णविराम दिला.
"कृपया विचार करुन वागा, फेक न्यूज पसरवणे थांबवा! कोणत्याही पुष्टीकरणाशिवाय काहीही स्टेटस ठेवणाऱ्या लोकांना अल्लाह चांगली बुद्धी देवो... अल्लाह आपल्या सर्वांना सुरक्षित ठेवो आणि या अपघातात मृत्यू पावलेल्या लोकांच्या कुटुंबियांना धैर्य दोवो," अशा आशयाचा संदेश अभिनेत्री अयेजा खान हिने सोशल मीडियावर शेअर केला. यामुळे तिच्या आणि पतीच्या मृत्यूच्या व्हायरल होणाऱ्या अफवांना चाप बसला. मात्र काही वेळाने अजेया हिने ही पोस्ट डिलिट केली.
पहा अभिनेत्रीने डिलिट केलेली पोस्ट:
तसंच या विमान अपघातात क्रिकेटर यासिर शाह याचा देखील मृत्यू झाला. अशा अफवा पसरल्या होत्या. मात्र या बातमीची पृष्टी झाली नव्हती. त्यानंतर नेटकऱ्यांनी यासिर शाह याला श्रद्धांजली अर्पण करुन कुटुंबियांप्रती संवेदना दाखवण्यास सुरुवात केली. मात्र ही देखील अफवा असल्याचे काही वेळाने समोर आले. (पाकिस्तान येथील विमान अपघात दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दु:ख)
पाकिस्तानी इंटरनॅशनल एअरलाईन्सचे लाहोर मधून कराची येथील जिना आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे निघालेले विमान लॅडिंगच्या काही मिनिटांपूर्वी क्रॅश झाले. या विमानत 99 प्रवासी प्रवास करत होते. यात 97 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती AFP वृत्तसंस्थेने दिली आहे.