Rasika Sunil Wedding: रसिका सुनील आदित्य बिलागी सोबत अडकणार लग्नबंधनात; खास फोटो शेअर करत दिली गोड बातमी

रसिका आणि तिचा बॉयफ्रेण्ड आदित्यने त्यांचा पेट रश सोबत एक खास फोटो शेअर करत ते लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती दिली आहे.

रसिका सुनील । PC: Instagram

'शनाया' म्हणून घराघरात पोहचलेल्या अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil)  ने अखेर लग्नाची गोड बातमी रसिकांना दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून रसिका आदित्य बिलागी (Aditya Bilagi) सोबत रिलेशनशीप मध्ये आहे. त्यांचे फोटो रसिका अनेकदा सोशल मीडीयामध्ये शेअर करत होती. आता आदित्यच्या इंस्टा पोस्ट वरूनच लग्नाची बातमी तिने दिली आहे. अद्याप तारीख जाहीर करण्यात आली नाही पण लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं म्हटलं आहे. नक्की वाचा: Rasika Sunil करतेय 'या' मुलाला करतेय डेट, रिलेशनशिपबाबत अभिनेत्रीने केला मोठा खुलासा.

अभिनेत्री रसिका सुनील 'माझ्या नवर्‍याची बायको' या मालिकेतील शनाया या पात्रामुळे घराघरात पोहचली होती. तिचा स्टायलिस्ट आणि मादक अंदाज अनेकांच्या पसंतीला पडला होता. मालिका सुरू असतानाच तिने ब्रेक घेत अमेरिकेत फिल्म मेकिंगचं शिक्षण देखील घेतलं. त्यानंतर रसिका भारतामध्ये परतली आहे. मध्यतंरी ती 'गर्लफ्रेंड' सिनेमामध्येही दिसली होती. नक्की वाचा: 'शनाया' फेम रसिका सुनील चा Sexy अंदाज सोशल मीडियात व्हायरल; फीटनेस फ्रीक्स देखील होतील थक्क (Photo).

आदित्य-रसिकाच्या लग्नाची गूडन्यूज

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditya Bilagi (@adi_bilagi)

आदित्य हा सॉफ्टवेअर इंजिनीअर असून तो लॉस एंजेलिसमध्ये रहायला आहे. अमेरिकेत असताना त्यांची एका कौटुंबिक ओळखीतल्या व्यक्तीच्या मध्यस्थीने ओळख झाली. पुढे या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं. अद्याप रसिका आदित्य चं लग्न कुठे, कसं, कधी होणार? हे सांगण्यात आलेले नाही. मात्र रसिकाच्या चाहत्यांनी ही गोड बातमी एकून दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement