#MeToo : निर्माता-दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा, असिस्टंट डिरेक्टरचा आरोप
MeToo चळवळ थोडी विश्रांती घेत असताना, यात चित्रपटसृष्टीमधील एक महत्वाचे नाव समोर येत आहे ते म्हणजे 'निर्माता-दिग्दर्शक राजकुमार हिरानी
तनुश्री दत्ता भारतात आली काय आणि गेली काय, मात्र एक गोष्ट तिने मागे सोडली ती म्हणजे मीटू चळवळ (MeToo Campaign). नाना पाटेकर यांच्यावर लावण्यात आलेल्या विनयभंगाच्या आरोपानंतर अनेक महिलांनी हिम्मत दाखवून, मिडीयासमोर येऊन आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. अगदी संस्कारी बाबू आलोकनाथ यांचेही नाव यात समोर आले होते. आता ही चळवळ थोडी विश्रांती घेत असताना, यात चित्रपटसृष्टीमधील एक महत्वाचे नाव समोर येत आहे ते म्हणजे 'निर्माता-दिग्दर्शक राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani). संजू (Sanju) चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनवेळी आपल्यावर अत्याचार (Sexual Harassment) झाला असल्याची माहिती या चित्रपटाच्या असिस्टंट डिरेक्टरने दिली आहे.
3 नोव्हेंबर 2018 रोजी या असिस्टंट डिरेक्टरने संजू चित्रपटाचे निर्माते विधू विनोद चोप्रा (Vidhu Vinod Chopra) आणि त्यांची पत्नी अनुपमा यांना एक इमेल पाठवून याबाबतचे माहिती दिली होती. या मेलमध्ये दिलेल्या माहितीनुसार राजू हिरानी यांनी या महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. जेव्हा या महिलेने या गोष्टीस नकार दिला तेव्हा त्यांनी हिला कमावरून काढून टाकण्याची तसेच कारकीर्द उध्वस्त करून टाकण्याची धमकी दिली. मात्र राजू हिरानी यांनी हे सारे आरोप फेटाळून लावले आहेत. (हेही वाचा : #MeToo मध्ये सई ताम्हणकरची उडी, आलोक नाथ नरकात सडेल ! तीव्र शब्दात प्रतिक्रिया)
या महिलेचे वडील आजारी आहेत, बॉलीवूडमध्ये सहजा सहजी काम मिळत नसल्याने ती मिळालेले काम टिकवून ठेवण्यासाठी शांत राहिली. आता हिरानी यांनी आपले वकील आनंद देसाई (Anand Desai) यांच्या मदतीने आपल्यावर झालेले सारे आरोप खोटे असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, राजू हिरानी हे अनिल कपूर आणि सोनम कपूर यांचा येऊ घातलेला चित्रपट 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'चे निर्माते आहेत. मात्र या आरोपानंतर क्रेडिट्समधून त्यांचे नाव हटवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.