Priyanka Chopra-Nick Jonas First Baby: प्रियंका चोपड़ा Surrogacy द्वारा झाली आई; सोशल मीडीयात शेअर केली गूड न्यूज!
2018 साली ते दोघं विवाहबद्ध झाले होते.
देसी गर्ल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि तिचा पती निक जोनस (Nick Jonas) हे सरोगसी (Surrogacy) द्वारा आई-बाबा झाले आहेत. अभिनेत्री प्रियंका चोप्राने सोशल मीडीयात इंस्टाग्रामवर ही गूड न्यूज शेअर केली आहे. दरम्यान तिने बाळ मुलगा आहे की मुलगी याबाबत खुलासा केलेला नाही मात्र या 'खास वेळे'मध्ये आमच्या प्रायव्हसीचा मान राखावा असं तिने पोस्ट मध्ये लिहलं आहे.
प्रियंका आणि निक यांचे हे पहिलच बाळ आहे. 2018 साली ते दोघं विवाहबद्ध झाले होते. राजस्थानमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. भारतीय हिंदू पद्धतीनुसार आणि ख्रिश्चन अंदाजातही हा सोहळा भारतातच पार पडला होता. त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला सेलिब्रिटींची मांदियाळी होतीच पण त्यासोबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हजेरी लावली होती.
प्रियंकाची पोस्ट
प्रियंका आणि निक यांच्यामध्ये 10 वर्षांचं अंतर आहे. बॉलिवूड मध्ये काम करणारी अभिनेत्री हॉलिवूड मध्येही आपलं नशीब आजमवण्यासाठी गेली. तेथेच तिची निकशी ओळख झाली. पुढे या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि ते दोघं विवाहबंधनात अडकले होते. निक हा गायक, संगीतकार आहे. 'जोनास ब्रदर्स' हे भाऊ एकत्र म्युझिकल शो, गाणी संगीतबद्ध करतात, गातात.
मध्यंतरी प्रियंकाने सोशल मीडीयात तिच्या आडनावामधून 'जोनस' हटवल्याने निक आणि तिच्यामध्ये बिनसलं असल्याच्या देखील वावड्या उठल्या होत्या. हे देखील नक्की वाचा: प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचं अमेरिकेतील घरातील खास फोटो .
प्रियंकाने ही गोड बातमी शेअर करताच तिच्या चाहत्यांकडून आणि बॉलिवूड मधील तिच्या कलाकार मित्र-मंडळींकडूनही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यापूर्वी बॉलिवूड मध्येही दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता सोहेल खान, शाहरूख खान, सनी लिओन आदींनी सरोगसीद्वारा त्यांच्या आयुष्यात बाळाचं स्वागत केले आहे.