Priyanka Chopra ने पती Nick Jonas साठी अमेरिकेमध्ये केलं करवा चौथ 2020 चं व्रत; इंस्टाग्राम वर शेअर केले रोमॅन्टिक फोटोज
रीतीनुसार प्रियंकाने साज शृंगार करत पती निकच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचं व्रत केले होते. लाल साडी मध्ये प्रियंका खुलून दिसत होती. दरम्यान निका जोनस देखील भारतीय वेशभूषेमध्ये होता. प्रियंकाने तिच्या करवा चौथ 2020 सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडीयामध्ये शेअर केले आहेत
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या अमेरिकेमध्ये आहे. पण भारतीय रीती रिवाजानुसार प्रियंकाने अमेरिकेत यंदाचा करवा चौथ 2020 साजरा केला आहे. अमेरिकन गायक निक जोनस (Nick Jonas) आणि भारतीय प्रियंका चोप्रा यांच्यामध्ये सांस्कृतिक, प्रादेशिक अंतर असले तरीही 'कपल गोल' असणारी क्यूट जोडी एकमेकांच्या संस्कृतीचा सन्मान करताना पहायला मिळाली आहे. रीतीनुसार प्रियंकाने साज शृंगार करत पती निकच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचं (Karwa Chauth) व्रत केले होते. लाल साडी मध्ये प्रियंका खुलून दिसत होती. दरम्यान निका जोनस देखील भारतीय वेशभूषेमध्ये होता. प्रियंकाने तिच्या करवा चौथ 2020 सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडीयामध्ये शेअर केले आहेत. Karwa Chauth 2020: बॉलिवूडमध्ये दिसली 'करवा चौथ'ची धूम; शिल्पा शेट्टी, सोनाली बेंद्रे, काजोल, बिपाशा बसू, रवीना टंडन अशा अभिनेत्रींनी केली पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजा (See Photos and Videos).
'आय लव्ह यू निक' असं म्हणत करवा चौथच्या शुभेच्छा प्रियंका चोप्राने दिल्या आहेत. सोबत तिचा लाल रंगाच्या शिफॉन साडीतील लूक शेअर केला आहे. यावेळेस निकने देखील इंडिगो कुर्ता परिधान केल्याचं पहायला मिळालं आहे. डिसेंबर 2018 मध्ये निक आणि प्रियंका भारतामध्ये विवाहबंधनात अडकले आहेत. जोनस कुटुंबाचं लग्नातही भारतीय संस्कृतीमधील रूप, धम्माल मस्ती पहायला मिळाली होती. आता लॉज एंजेलिसमध्ये राहणारी प्रियंका देखील तेथे रीती-रिवाज जपताना पहायला मिळाली आहे.
प्रियंका चोप्रा पोस्ट
प्रियंका आणि निक लवकरच अमेझॉनच्या डांस शो मध्ये एकत्र झळकणार आहेत. दरम्यान भारतीय लग्नामधील 'संगीत' ही त्याची थीम आहे. सध्या कोविड संकटामुळे त्याच प्रोडक्शन पुढे ढकलण्यात आहे. सोबतच प्रियंका नेटफ्लिक्सच्या व्हाईट टायगर मध्ये दिसणार आहे. द मॅट्रिक्स 4 साठी देखील तिने शुटिंग सुरू केले आहे. दरम्यान यासोबतच प्रियंकाचे काही आगामी प्रोजेक्ट्स विविध टप्प्यांत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Nov 05, 2020 12:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

