प्रतिक बब्बर अडकणार लग्नबंधनात; पाहा कोण आहे राज बब्बर आणि स्मिता पाटील यांची होणारी सून

राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्या पुत्र प्रतिक बब्बर आपली प्रेयसी सान्या सागर (Sanya Sagar) हिच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

प्रतिक बब्बर आणि सान्या सागर (Photo credits: Instagram)

2018 हे वर्ष गाजले ते म्हणजे बॉलीवूड सेलेब्जच्या लग्नाने. मागच्या वर्षी लग्नाचे फार कमी मुहूर्त होते त्यामुळे अगदी दीपिका, सोनम, प्रियंका पासून ते कपिल शर्मा अशा अनेकांनी आपले शुभमंगल उरकून टाकले. आता नव्या वर्षात पहिल्या महिन्यात अजून एका सेलिब्रिटीचे लग्न होऊ घातले आहे. हा अभिनेता म्हणजे राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्या पुत्र प्रतिक बब्बर (Prateik Babbar). 32 वर्षीय प्रतिक आपली प्रेयसी सान्या सागर (Sanya Sagar) हिच्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. हा विवाहसोहळा 22 आणि 23 जानेवारी रोजी संपन्न होईल.

 

View this post on Instagram

 

#monday.. "holy snappp!.. that just happened!"

A post shared by prateik babbar (@_prat) on

गेली दोन वर्षे प्रतिक आणि सान्या एकमेकांना डेट करत होते. मागच्या वर्षी जानेवारीमध्ये प्रतिक आणि सान्या यांचा साखरपुडा पार पडला.

 

View this post on Instagram

 

#gymdate thats gone well so far!! #birthdayboy @ryan101982 thanks for the picture

A post shared by Sanya Sagar (@pynkmoss) on

सान्या ही व्यवसायाने लेखक आणि दिग्दर्शक आहे. सान्याने नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजीमधून फॅशन कम्युनिकेशनमध्ये गॅज्युएशन केले आहे. त्यानंतर लंडनच्या फिल्म अकादमीमधून तिने फिल्म मेकिंगचा डिप्लोमा केला.

 

View this post on Instagram

 

#aftersun #iloveislandlife #waterbaby #scubadiving

A post shared by Sanya Sagar (@pynkmoss) on

 

View this post on Instagram

 

Once again #adaywellspent

A post shared by Sanya Sagar (@pynkmoss) on

 

View this post on Instagram

 

#tbt - from #maurice with love - love sanz n’ prat - @pynkmoss

A post shared by prateik babbar (@_prat) on

प्रतिकचे वडील राज बब्बर हे कॉंग्रेसचे मोठे नेते आहेत, तर सान्याचेही वडील पवन सागर राजकारणात सक्रीय आहेत. लखनऊ येथे हा विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यानंतर मुंबई येथे लग्नाचे रिसेप्शन होईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now