Pornography Case: पॉर्नग्राफीप्रकरणी अभिनेत्री शर्लिन चोप्राची होणार चौकशी, मुंबई क्राइम ब्रँचच्या प्रॉपर्टी सेलने बजावले समन्स
पोर्नोग्राफी प्रकरणात (Pornography case) शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांना अटक झाल्यानंतर गुन्हे शाखेने ( Crime Branch) वेगाने तपास सुरू आहे.
पोर्नोग्राफी प्रकरणात (Pornography case) शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांना अटक झाल्यानंतर गुन्हे शाखेने ( Crime Branch) वेगाने तपास सुरू आहे. याप्रकरणी अभिनेत्री गेहाना वशिष्ठ (Gehana Vasisth) आणि इतर दोन जणांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) हिलाही मुंबई क्राईम ब्रॅंचच्या प्रॉपर्टी सेलने समन्स बजावले आहे. तिला उद्या सकाळी 11 वाजता हजर राहून जाब नोंदवण्यासाठी सांगितले आहे. याबाबत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) माहिती दिली आहे.
प्रसार माध्यमानुसार, आता राज कुंद्राच्या अटकेच्या प्रकरणात गुन्हे शाखा शेरलिन चोप्राचीही चौकशी करेल आणि यासंदर्भात अभिनेत्रीला समन्स पाठविण्यात आले आहे. नुकताच शार्लिन चोप्राने नुकताच ट्विटरवर हा व्हिडिओ राज कुंद्रा आणि पॉर्नग्राफी संदर्भात एक व्हिडिओ उघडपणे शेअर केला आहे. ज्यात महाराष्ट्र सायबरशी या विषयावर बोलणारी ती पहिली असल्याचे सांगत आहे. हे देखील वाचा- Raj Kundra Arrest: राज कुंद्रा च्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; ED आर्थिक व्यवहारांबाबत करू शकते चौकशी
एएनआयचे ट्वीट-
शार्लिन चोप्राचे ट्वीट-
मुंबई पोलिसांनी पॉर्नग्राफी प्रकरणात फेब्रुवारी 2021 मध्ये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांनी यापूर्वीच महाराष्ट्र सायबर सेलमध्ये आपली जाब नोंदविली होती. दरम्यान, राज कुंद्रा यांननी तिला अडल्ट फिल्म इंडस्ट्रीजमध्ये झोकले होते, असा आरोप शर्लिन चोप्राने केला होता. त्यासाठी राज कुंद्राने तिच्यासोबत करारही केला असल्याचे माहिती समोर येत आहे.