गरोदर असण्याच्या वृत्तावर Poonam Pandey हिने सोडले मौन, चाहत्यांना दिला महत्वाचा सल्ला
त्यांच्या लग्नाला काही महिने उलटत नाहीत, तोपर्यंत पूनम पांडे गर्भवती असल्याचा चर्चा सर्वत्र सुरु आहेत. ती गर्भवती असल्याचा बातम्या आता सोशल मीडियावरही व्हायरल होऊ लागल्या आहेत
पूनम पांडे (Poonam Pandey) आणि सॅम बॉम्बे (Sam Bombay) यांनी गेल्या वर्षी लगाच्या बेडीत अडकले आहेत. त्यांच्या लग्नाला काही महिने उलटत नाहीत, तोपर्यंत पूनम पांडे गर्भवती असल्याचा चर्चा सर्वत्र सुरु झाल्या. ती गर्भवती असल्याचा बातम्या आता सोशल मीडियावरही व्हायरल होऊ लागल्या आहेत. यावर नुकतीच पूनम पांडेने आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने नुकत्यात दिलेल्या एका मुलाखातीत या सर्व अफवा असल्याचे सांगितले आहे. तसेच तिचे जीवन उघड्या पुस्तकासारखे आहे, ज्यावेळी ती गरोदर असेल, याची सर्वांना माहिती शेअर केली जाईल. तसेच गरोदर राहणे यासारखी कोणत्याही स्त्रियांसाठी दुसरी आनंदाची बातमी नाही. पण तिने अजूनही मुलांचा विचार केला नसल्याचे सांगितले आहे.
नुकतीच पूनमने झूमला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने गरोदर असण्याच्या वृत्तावर मौन सोडले आहे. ती म्हणाले की, अशा बातम्यांवर डोळे झाकून विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची सत्यता जाणून घेणे आवश्यक आहे. कारण, ही तोंड गोड करणारी बातमी आहे, असेही तिने म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, याआधीही पूनम गर्भवती असल्याचा अफवा सोशल मीडियावर पसरवण्यात आली होती. त्यावेळीही पूनमने या बातमीत तथ्थ नसल्याचे सांगितले होते. हे देखील वाचा- Happy Birthday Makarand Anaspure: विनोदवीर मकरंद अनासपुरे चे धम्माल कॉमेडी सिन्स
पूनम पांडे-
पूनम आणि सॅम गेल्या वर्षी लग्नानंतर अधिक चर्चेत आले होते, जेव्हा ते दोघेही आपल्या हनीमूनसाठी गोव्यात गेले होते. जिथे दोघांमध्ये खूप भांडण झाले. त्यानंतर पूनमने सॅमवर पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप केला होता. मात्र, त्यानंतर दोघांमधील वाद मिटला. मुंबईत काही दिवसांपूर्वी ते दोघेही पुन्हा एकत्र दिसले होते.