Mumbai: हिंदुस्थानी भाऊ याला पोलिसांकडून अटक, नेमके काय आहे प्रकरण? जाणून घ्या
बिग बॉसच्या घरात एन्ट्री केलेल्या माजी कंटेस्टेंट सोशल मीडियात हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau) नावाने प्रसिद्ध असलेल्या विकास पाठक याला मुंबई पोलिसांना अटक केली आहे.
Mumbai: बिग बॉसच्या घरात एन्ट्री केलेल्या माजी कंटेस्टेंट सोशल मीडियात हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau) नावाने प्रसिद्ध असलेल्या विकास पाठक याला मुंबई पोलिसांना अटक केली आहे. ही बातमी पॅपराजी विरल भयानी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केली आहे. यामध्ये विरल यांनी लिहिले आहे की, हिंदुस्थानी भाऊ मुंबईतील शिवाजी पार्क येथे आंदोलन करत होते. त्यानंतर पोलिसांनी त्याला थोड्यावेळा पूर्वीच अटक केली आहे. हिंदुस्थानी भाऊ 12 वी मधील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यासाठी आंदोलन करत होते. त्याचसोबत अशी ही मागणी केली की, सरकारने शाळेतील विद्यार्थ्यांची फी सुद्धा माफ करावी.
सोशल मीडियात आपण हिंदुस्थानी भाऊ याचे व्हिडिओ पाहिलेच असतील. त्याने नुकत्याच आपल्या सोशल मीडियातील एकाउंटवर भडकाऊ पोस्ट केल्याने ते बंद करण्यात आले. असे म्हटले जाते की, त्यांचे अकाउंट बंद करण्यामागे लेखक पुनीत शर्मा याचा हात होता. त्याचे अकाउंट 2020 मध्येच निलंबित करण्यात आले. त्यानंतर हिंदुस्थानी भाऊ याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होणे बंद झाले.(Chhota Rajan साठी ऑक्सिजन आणि बेडची मागणी करणा-या Ram Gopal Varma भडकले लोक, दिग्दर्शकला केले Troll)
हिंदुस्थानी भाऊ सुरुवातीला आपल्या व्हिडिओमुळे फारच चर्चेत होता. तो आपल्या व्हिडिओतून विविध घटनांसंबंधित व्हिडिओ मधून आपली प्रतिक्रिया देत असे. या व्हिडिओला बहुतांश जणांकडून लाईक्स ही केले जात होते. याशिवाय हिंदुस्थानी भाऊ याच्या व्हिडिओ संदर्भात रिपोर्ट करणारे सुद्धा काही जण होते. भाऊच्या एखा व्हिडिओवर पुनीत शर्मा याने तक्रार केली आणि इंस्टाग्रामवरील विकासचे अकाउंट बंद करण्यात आले. विकास याला सुरुवातीला संजय दत्त याचा मोठा फॅन असल्याचे म्हटले जात होते. परंतु त्याने कधीच याबद्दल कबुल केले नाही.