Zero song Issaqbaazi : पाहा शाहरुख आणि सलमानच्या नृत्य जुगलबंदीचा अविष्कार

सलमान-शाहरुखच्या नृत्याची जुगलबंदी या गाण्यात पाहायला मिळते

‘इस्सकबाजी’ गाणे (Photo Credits: Youtube)

येत्या 21 डिसेंबर रोजी शाहरुख खानचा महत्वाकांक्षी चित्रपट झिरो (Zero) प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये निर्मात्यांनी कोणतीच कसर ठेवली नाही. म्हणूनच आता ज्या गाण्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते ते झिरो चित्रपटामधील ‘इस्सकबाजी’ (Issaqbaazi) गाणे प्रदर्शित झाले आहे. शाहरुखने पुन्हा एकदा आपल्या हटके नृत्याची झलक या गाण्यातून दाखवली आहे. इर्शाद कामिलचे भोजपुरी शब्द, अजय-अतुलचे भारदस्त संगीत आणि सुखविंदर सिंग व दिव्या कुमारचा आवाज असे दिग्गज एकत्र आल्यानंतर जो धमाका घडतो तो या गाण्यातून स्पष्टपणे दिसून येतो. या गाण्याचे वैशिष्ठ्य म्हणजे या गाण्यात शाहरुखसोबत सलमान खानही थिरकताना दिसत आहे. सलमान-शाहरुखच्या नृत्याची जुगलबंदी या गाण्यात पाहायला मिळते.

उंचीने लहान असणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित झिरो चित्रपट आहे. 1989 रोजी कमल हसनने ’अप्पू राजा’ सिनेमातून अशा बुटक्या माणसाची भूमिका साकारली होती. त्यानंतर 31 वर्षांनी असा वेगळा प्रयोग ‘झिरो’ चित्रपटातून होत आहे. या चित्रपटात अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत असून, कतरिना कैफ सेलिब्रिटी हिरोईनची भूमिका साकारत आहे.

याधी प्रदर्शित झालेले मेरे नाम तू (Mere Naam Tu) हे गाणेही प्रेक्षकांना भावले होते.  या गाण्याचे संगीत अजय-अतुलच्याच लोकप्रिय 'सैराट' चित्रपटामधील 'सैराट झालं जी'वर आधारीत आहे.

सिनेमात सलमानसोबत काजोल, राणी मुखर्जी, दीपिका पादुकोन, जुही चावला, करीश्मा कपूर,  आर माधवन आणि आलिया भट्ट अशा कलाकारांची मांदियाळी पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे पाहुणे कलाकार म्हणून श्रीदेवी सुद्धा आपल्या या चित्रपटात दिसणार आहे.