गूढरीत्या गायब असलेल्या चीनमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रीला ठोठावला 951 करोड रुपयांचा दंड

तिने कर चुकवण्यासाठी खोटे उत्पन्न दाखवले होते.

फानॅ बिंगबिंग (Picture Courtesy: Instagram)

लाखो चीनी तरुणांच्या हृदयाची धडकन असलेली लोकप्रिय अभिनेत्री फॅन बिंगबिंग ही जुलैपासून बेपत्ता आहे. फक्त चीनमध्येच नाही तर हॉलीवूडमध्येही लोकप्रिय असलेली अभिनेत्री गायब झाल्यापासून कित्येकांना अन्न गोड लागत नव्हते. तिच्या गूढरित्या गायब होण्याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले गेले. मात्र आता या प्रकरणाबद्दल एक महत्वाची धक्कादायक बातमी समोर येत आहे. सरकारने या अभिनेत्रीवर कर बुडवल्याचा आरोप करीत तब्बल 951 करोड रुपयांचा दंड ठोठावला आहे.

चीनमधील सर्वात जास्त श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या फॅनवर आणि तिच्या या कंपनीवर हा कर चुकवल्याचा आरोप आहे. तिने कर चुकवण्यासाठी खोटे उत्पन्न दाखवले होते. याचसाठी तिला 951 करोड रुपयांचा दंड ठोठावला आहे. तिच्या एजंटला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. हा दंड तिनं दिलेल्या मुदतीत न भरल्यास तिला तुरूंगवासही होऊ शकतो. (हेही वाचा - अभिनेत्री बिंगबिंग बेपत्ता)

मात्र आता अनेक महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या या अभिनेत्रीने घाबरून सोशल मिडियावर माफीनामा लिहिला आहे.

या माफीनाम्यात फॅन लिहिते ‘मी गेल्या काही महिन्यांपासून तीव्र वेदनेतून जात आहे. या काळात मला आत्मनिरीक्षण करण्यासाठी संधी मिळाली. माझ्याकडून जे काही झाले त्याबद्दल मला अतिशय वाईट वाटत आहे आणि मी स्वतःला दोषी देखील मानत आहे. ज्या काही चुका घडल्या आहेत त्याबद्दल मी माफी मागते. खूप जास्त कालावधीसाठी मी माझ्या देशाप्रती असलेल्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडू शकले नाही. एक सेलिब्रिटी म्हणून मीलोकांसमोर एक चुकीचे उदाहरण ठेवले. मला देश आणि कर याबाबतचे नियम ओळखायला हवे होते. त्यामुळे आता कायद्याने जो निर्यण दिला आहे तो मला मान्य आहे. कर विभागाने मला जो दंड ठोठावला आहे to मला मान्य आहे. मी लवकरच कर आणि दंडाची रक्कम चुकती करेन. तुमच्या प्रेम आणि विश्वासाशिवाय फॅनचचे अस्तित्त्वच नाही’

36 वर्षांची फॅन ही अनेक प्रतिष्ठित ब्रँडची सदिच्च्छा दूत आहे. तसेच जगातील सर्वाधिक सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्रींपैकी ती एक आहे. फॅनकडे एक फॅॅशन आयकॉन म्हणून देखील पहिले जाते. मागच्या वर्षी फ़ोर्ब्सच्या सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्येदेखील तिचे नाव होते.  मात्र जुलै महिन्यापासून ती कुठे आहे याची कोणालाच कल्पना नाही.



संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

RJ Simran Singh Dies by Suicide in Gurugram: जम्मू-काश्मीरमधील 25 वर्षीय लोकप्रिय आरजे सिमरन सिंगचा गुरुग्राममध्ये मृत्यू, नैराश्याने ग्रस्त असल्याचा दावा

Ranveer Allahbadia सह त्याच्या गर्लफ्रेंडला गोव्याच्या किनारी मिळालं जीवनदान; प्रशासकीय अधिकारी जोडप्याने दोघांना बुडताना वाचवलं

Allu Arjun: 'अल्लू अर्जुन येण्यापूर्वीच चेंगराचेंगरी झाली...', आशयाच्या पोस्ट व्हायरल; पोलिंसाकडून कडक कारवाईचा इशारा

Allu Arjun: अल्लू अर्जुन आणि पुष्पा चित्रपट निर्मात्यांकडून चेंगराचेंगरीतील मृत महिलेच्या कुटुंबाला 2 कोटींची मदत जाहीर