Marina Kuwar Photos: सोनू निगम- भुषण कुमार यांच्या वादामुळे मरीना कुंवर हिच्या नावाची सर्वत्र चर्चा; पहा तिचे काही सुंदर फोटो

टी-सिरिजचा (T-Series) मालक भूषण कुमार (Bhushan Kumar) याला धमकावत गायक सोनू निगम (Sonu Nigam) याने काल एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडिओ नंतर मरीना कुंवर हिचे नाव आता पुन्हा चर्चेत आले असताना तिचे काही सुंदर फोटो सुद्धा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत

Marina Kuwar Photos (Photo Credits: Instagram)

टी-सिरिजचा (T-Series) मालक भूषण कुमार (Bhushan Kumar) याला धमकावत गायक सोनू निगम (Sonu Nigam) याने काल एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यात सोनुने कुमार याला 'माझ्या नादी लागलास तर, मरीना कुंवर (Marina Kuwar) चा व्हिडीओ युट्यूब चॅनलवर पब्लिश करेन आणि मग त्याचं पुढे काय होतं ते तू बघून घे' अशा शब्दात जवळपास अल्टिमेटमच दिला होता. या व्हिडीओ नंतर सर्वत्र मरीना कुंवर हे नाव चर्चेत आहे. मरीना कुंवर ही एक मॉडेल आणि टिव्ही अभिनेत्री आहे. मरीनाने 'जिंदगी तुमसे', 'जग्‍गू दादा', 'शपथ', 'सीआईडी' आणि 'आहट' या मालिकांमध्ये काम केले आहे. मरीना कुंवर हिचे नाव आता पुन्हा चर्चेत आले असताना तिचे काही सुंदर फोटो सुद्धा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

2018 मध्ये मरीना कुंवरने दिग्दर्शक साजिद खान आणि भूषण कुमार याच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला होता. भूषणने मला व्हिडिओमध्ये काम देण्याची ऑफर देत घरी बोलावलं होतं आणि माझ्याबरोबर चुकीचं वर्तन केलं होतं, असं मरीनाने या मुलाखतीत सांगितलं होतं. याच पार्श्वभूमीवर सोनुने भूषण कुमार याला धमकावले आहे.

मरीना कुंवर फोटो

 

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝐌𝐚𝐫𝐢𝐧𝐚 𝐊𝐮𝐰𝐚𝐫 (@marinakuwar) on

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝐌𝐚𝐫𝐢𝐧𝐚 𝐊𝐮𝐰𝐚𝐫 (@marinakuwar) on

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝐌𝐚𝐫𝐢𝐧𝐚 𝐊𝐮𝐰𝐚𝐫 (@marinakuwar) on

 

View this post on Instagram

 

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝐌𝐚𝐫𝐢𝐧𝐚 𝐊𝐮𝐰𝐚𝐫 (@marinakuwar) on

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝐌𝐚𝐫𝐢𝐧𝐚 𝐊𝐮𝐰𝐚𝐫 (@marinakuwar) on

दरम्यान, मरीनाचे नाव मयूर वर्मा या टीव्ही स्टारला डेट करत असताना सुद्धा चर्चेत आले होते, 2016 मध्ये या दोघांचा ब्रेकअप झाला. 2017 मध्ये मरीना हिला अक्षय कुमार सोबत मिलियन डॉलर बेबी या चित्रपाटाच्या हिंदी रिमेक साठी कास्ट करण्यात आले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement