Jeevan Gaurav Award: ज्येष्ठ मराठी अभिनेते Mohan Agashe यांना राज्यस्तरीय Atal Karandak एकांकिका स्पर्धेत 'जीवन गौरव' पुरस्कार जाहीर

एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Actor Mohan Agashe (PC - Twitter)

Jeevan Gaurav Award: राज्यस्तरीय 'अटल करंडक' (Atal Karandak) एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत 10 डिसेंबर 2023 रोजी पनवेल (Panvel) येथे ज्येष्ठ कलाकार पद्मश्री डॉ. मोहन आगाशे (Actor Mohan Agashe) यांना 'जीवन गौरव' पुरस्कार (Jeevan Gaurav Award) प्रदान करण्यात येणार आहे. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आणि सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष रामशेठ ठाकूर यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'अटल करंडक' एकांकिका स्पर्धेचे हे दहावे वर्ष आहे. (हेही वाचा -Khurchi Movie Poster: राकेश बापटच्या ‘खुर्ची’ चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज, 12 जानेवारीला होणार प्रदर्शित)

स्पर्धेची अंतिम फेरी 8 ते 10 डिसेंबर दरम्यान पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर याआधीच प्राथमिक फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाने नवीन संकल्पनांचा परिचय करून देण्यासाठी आणि दर्जेदार एकांकिका सादर करण्याकडे लक्ष वेधले आहे.

दरम्यान, 10 डिसेंबर रोजी पारितोषिक वितरण समारंभात मोहन आगाशे यांना 'जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. या कार्यक्रमात राज्यभरातील 100 हून अधिक एकांकिका सहभागी होतील.