Valentines Day Offer: रितेश, जेनेलिया यांचा 'वेड' पाहायला मिळणार फक्त 99 रुपयांत; जाणून घ्या खास कारण
खास 'व्हॅलेंटाईन विक' (Valentine's Week) निमित्त या जोडीने चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी खास ऑफर देऊ केली आहे. या ऑफरनुसार 'व्हॅलेंटाईन डे' (Valentines Day) ला 'वेड' चित्रपट केवळ 99 रुपयांमध्ये पाहता येणार आहे.
रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जेनेलिया डिसुझा (Genelia D'souza) यांच्या नुकत्याच प्रदर्शीत झालेल्या 'वेड' (Ved Movie) चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभतो आहे. तिकीट बारीवर हा चित्रपट चांगलाच गल्ला जमवताना दिसतो आहे. दरम्यान, आपल्या चाहत्यांसाठी आणि सिनेरससिकांसाठी रितेश आणि जेनेलिया (Riteish & Genelia) ही जोडी आणखी एक मस्त ऑफर घेऊन आली आहे. खास 'व्हॅलेंटाईन विक' (Valentine's Week) निमित्त या जोडीने चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी खास ऑफर देऊ केली आहे. या ऑफरनुसार 'व्हॅलेंटाईन डे' (Valentines Day) ला 'वेड' चित्रपट केवळ 99 रुपयांमध्ये पाहता येणार आहे. होय, कदाचित तुमचा तुमच्याच कानांवर, डोळ्यांवर वाचताना विश्वास बसणार नाही. पण, खरोखरच अशी ऑफर (Valentines Day Offer) ठेवण्यात आली आहे.
'वेड' चित्रपटाचे तिकीट केवळ 99 रुपयांमध्ये काढून तुम्ही हा चित्रपट पाहू शकता आणि आपला व्हॅलेंटाईन आणखी स्पेशल ठरवू शकता. रितेश देशमुख याने त्याच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये या ऑफरबाबत माहिती दिली आहे. या पेजवरुन माहिती देताना रितेशने म्हटले आहे की, 'तुमचा वेलेंटाईन डे आणखी स्पेशल बनवा तुमच्या 'वेड' सोबत. वेड फक्त 99 रुपयांमध्ये..आताच तुमच तिकिट बुक करा..' (हेही वाचा: Ved Film: 'वेड' चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद; अभिनेत्री Genelia D'Souza ने मानले प्रेक्षकांचे आभार (Watch).)
रितेश देशमुख आणि जेनिलीया देशमुख या जोडीने बॉलिवूडमध्ये काही चित्रपट एकत्र केले आहेत. परंतू, अभिनेत्री म्हणून जिनिलियाचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे. रितेश जिनीलियाची जोडी मराठी चित्रपट प्रेमी आणि दोघांच्याही चाहत्यांना चांगलीच आवडली आहे. त्यामुळे या चित्रपाचे बॉक्स ऑफिसवर चांगलेच स्वागत झाले आहे. या सिनेमाने विक्रमी कमाई केल्यामुळे त्यांच्यावर चहुबाजूंनी कौतुकाचा वर्षाव होतो आहे. चित्रपटाची होणारी कमाई आणि त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. बाकी काही असले तरी तुम्ही मात्र व्हॅलेंटाईन ऑफरचा नक्की लाभ घेऊ शकता. हा सिनेमा आपण केवळ 99 रुपयांमध्ये पाहू शकता.