Unmarried Marathi Actress: मराठीमधील लोकप्रिय अभिनेत्री ज्या वयाच्या तिशीनंतरही आहेत अविवाहित, See List

‘एकुलती एक’ या चित्रपटामधून तिने चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तिने अनेक मराठी चित्रपट, वेब सिरीज, नाटकांमधून भूमिका केल्या.

Unmarried Marathi Actress (Photo Credit : Instagram)

Unmarried Marathi Actress: आजकालच्या पिढीसाठी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासोबत व्यावसायिक आयुष्यही तितकेच महत्वाचे झाले आहे. किंबहुन आपल्या आजूबाजूला असे अनेक तरुण-तरुणी दिसतील ज्यांनी करिअरला प्राधान्य दिल्याने उशिरा लग्न केले आहे. चित्रपटविश्वात तर उशिरा लग्न करणे ही गोष्ट काही नवीन नाही. हिंदीसह मराठीमध्ये असे अनेक अभिनेते, अभिनेत्री आढळतील ज्यांनी वयाची 30-40 वर्षे पूर्ण केली तरी अजून लग्न केले नाही. तर आज आम्ही तुम्हाला अशाच काही 30 ओलांडलेल्या मराठी तारकांबाबत (Marathi Actress) सांगणार आहोत ज्या अजूनही अविवाहित (Unmarried) आहेत.

मुक्ता बर्वे (Mukta Barve) -

 

View this post on Instagram

 

A post shared by Mukta Barve (@muktabarve)

या यादीमधील सर्वात पहिले नाव आहे ते म्हणजे मुक्ता बर्वे. मुक्ता आपल्या विविधांगी, आशयप्रधान भूमिकांसाठी ओळखली जाते. 17 मे 1979 रोजी मुक्ताचा जन्म झाला असून, वयाच्या 41 व्या वर्षीही ती अजून अविवाहित आहे. मुक्ताने अग्निहोत्र, मुंबई-पुणे-मुंबई, जोगवा, आम्ही दोघी अशा अनेक मालिका व सीरिअलमधून भूमिका केल्या आहेत. (हेही वाचा: मराठी सिनेसृष्टीतील 'या' जोड्या पुढील वर्षी होणार विवाहबद्ध; दिवाळी 2020 निमित्त अभिनेत्रींची खास पोस्ट)

मंजिरी फडणीस (Manjari Fadnnis) –

 

View this post on Instagram

 

A post shared by Manjari Fadnnis (@manjarifadnis)

मंजिरीचा जन्म 10 जुलै 1988 साली झाला आहे. सध्या ती 32 वर्षांची असून अजूनही अविवाहित आहे. मंजिरीने हिंदी, तेलगू, बंगाली, तामिळ, कन्नड, मल्याळम आणि मराठी भाषेत चित्रपट केले आहेत.

सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) –

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝑺𝒖𝒓𝒖𝒄𝒉𝒊 𝑵𝒂𝒈𝒆𝒔𝒉 𝑨𝒅𝒂𝒓𝒌𝒂𝒓 (@suruchiadarkar)

सुरुची अडारकर हा मराठी मालिका विश्वातील एक लोकप्रिय चेहरा आहे. सुरुचीचा जन्म 25 एप्रिल 1988 रोजी झाला आहे. ते देखील 32 वर्षांची असून अजून अविवाहित आहे. ‘का रे दुरावा’ या मालिकेमधून सुरुचीला लोकप्रियता मिळाली होती.

प्राजक्ता माळी (Prajaktta Mali) -

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝑺𝒖𝒓𝒖𝒄𝒉𝒊 𝑵𝒂𝒈𝒆𝒔𝒉 𝑨𝒅𝒂𝒓𝒌𝒂𝒓 (@suruchiadarkar)

‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेले नाव म्हणजे प्राजक्ता माळी. त्यानंतर प्राजक्ताने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले. 8 ऑगस्ट 1989 रोजी प्राजक्ताचा जन्म झाला असून, अजून ती सिंगल आहे. मात्र मागच्या वर्षी टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्राजक्ताने सांगितले होते की, 2020 मध्ये तिचे लग्न होण्याची शक्यता आहे.

श्रिया पिळगावकर (Shriya Pilgaonkar) –

 

View this post on Instagram

 

A post shared by Shriya Pilgaonkar (@shriya.pilgaonkar)

अभिनेता सचिन व सुप्रिया पिळगावकर यांची कन्या श्रिया पिळगावकर हे गेल्या काही वर्षांमधील एक चर्चित नाव आहे. ‘एकुलती एक’ या चित्रपटामधून तिने चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तिने अनेक मराठी चित्रपट, वेब सिरीज, नाटकांमधून भूमिका केल्या. श्रियाचा जन्म 25 एप्रिल 1989 साली झाला असून, ती सध्या 31 वर्षांची आहे व अजूनही सिंगल आहे.

तर मित्रांनो या काही मराठी तारका होत्या ज्या वयाची 30 वर्षे उलटूनही अजूनही अविवाहित आहेत. लग्न कधी करायचे किंवा करायचे का नाही, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणूनच वर नमूद केलेल्या माहितीकडे फक्त माहिती म्हणूनच पहा.