Raj Thackeray: तेजस्विनी पंडित आणणार मनसे प्रमुखांवर चित्रपट? सेटवरील फोटो व्हायरल

फोटोत आजुबाजुला लोकही दिसत आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट येणार असल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक फोटो यासाठी निमित्त ठरला आहे. ज्यामध्ये हुबेहुब राज ठाकरेंसारखी सफेद सदरा, गळ्यात मफलर घातलेली व्यक्ती दिसत आहे.  हा फोटो फोटो अभिनेत्री तेजस्विनी पंडितचा आहे. या फोटोत तिच्याबरोबर एक व्यक्ती दिसत आहे, त्यामुळे या फोटोची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर राज ठाकरेंवर (Raj Thackeray) आधारित चित्रपट येणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (हेही वाचा - National Film Award 2024: 'वाळवी' सर्वोत्कृष्ठ तर 'वारसा' सर्वोत्तम कला सांस्कृतिक पुरस्काराने सन्मानित, जाणून घ्या संपूर्ण यादी)

मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडित व राज ठाकरेंच्या कुटुंबियांचे जवळचे संबंध आहेत. अनेकदा तेजस्विनी राज ठाकरे यांच्याबरोबरचे फोटो पोस्ट करत असते.  या फोटोमध्ये राज ठाकरे यांच्यासारखी हुबेहुब दिसणारी एक व्यक्ती अभिनेत्री तेजस्विनी पंडितबरोबर दिसत आहे. फोटोत आजुबाजुला लोकही दिसत आहे. त्यामुळे हा फोटो शूटिंग सेटवरचा असल्याचं दिसत आहे.

अभिनेत्री, दिग्दर्शिका की निर्माती- तेजस्विनी पंडितची भूमिका यापैकी नेमकी कोणती? असेल असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. तेजस्विनी पंडितने याबाबत अद्याप माहिती दिलेली नाही. त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरं तेजस्विनी पंडित यांच्याकडून मिळण्याची अपेक्षा आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif