Fresh Lime Soda Poster: मराठी चित्रपट 'फ्रेश लाईम सोडा' चे पोस्टर प्रदर्शित, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहरे ही जोडी पुन्हा येणार एकत्र

या पोस्टरवर 'फ्रेश लाईम सोडा' प्रवास स्वप्नांचा असे कॅप्शन देण्यात आले आहे.

Fresh Lime Soda Poster (Photo Credits: Instagram)

अभिषेक जावकर दिग्दर्शित 'फ्रेश लाईम सोडा' (Fresh Lime Soda Poster) हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नावाप्रमाणे मराठीत एका वेगळा विषय या चित्रपटातून हाताळण्यात येईल असे म्हणायला हरकत नाही. या सिनेमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमातून 'मितवा' या चित्रपट झळकलेल्या मराठीतील दोन सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) आणि प्रार्थना बेहरे (Prathana Behere) पुन्हा या चित्रपटातून एकत्र येणार आहेत. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले असून या सिनेमातील अभिनेत्रीने सोशल मिडियावर याबाबत पोस्ट केले आहे.

या पोस्टरमध्ये एक कार दाखवली आहे ज्यात दोन मुली पाठीमागून दिसत आहे. या पोस्टरवर 'फ्रेश लाईम सोडा' प्रवास स्वप्नांचा असे कॅप्शन देण्यात आले आहे.हेदेखील वाचा- Manasi Naik च्या लग्नविधींदरम्यान तिच्या आईने घेतलेला उखाणा ऐकून होणारा जावई प्रदीप खरेरा ने या व्हिडिओखाली केले 'हे' खास कमेंट, Watch Video

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

या पोस्टर कारच्या दरवाज्यात उभ्या असलेल्या अभिनेत्री सोनाली आणि प्रार्थना बेहरे असणार असंच वाटत आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक जावकर यांनी केले आहे. रेड बल्ब स्टुडिओज प्रस्तुत फ्रेश लाईम सोडा या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखीनच वाढली आहे. या चित्रपटाची निर्मिता Redbulb Movies, Unparalleled Media आणि The Fledgers Entertainment यांनी केली आहे.

हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार तसेच या चित्रपटाचा नायक कोण असणार, तसेच यात आणखी कोणकोणते कलाकार असणार याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र नावावर आणि यात असलेल्या अभिनेत्रींमुळे या चित्रपटाबाबतची प्रेक्षकांची उत्कंठा वाढली असेल हे नक्की!