हिरव्या साडीत खुलून आले हॉट अभिनेत्री स्मिता गोंदकर चे सौंदर्य, पाहा फोटोज
Smita Gondkar in green Saree (Photo Credits: Instagram)

'बिग बॉस मराठी 1' प्रसिद्धीच्या झोतात आलेली मराठीची हॉट आणि बोल्ड अभिनेत्री स्मिता गोंदकर (Smita Gondkar) सोशल मिडियावर खूपच सक्रिय असते. तिच्या हॉट आणि बोल्ड अंदाजामुळे ती बरीच चर्चेत असते. पण नवरात्री सणाचे औचित्य साधून स्मिताने नवरंगातील साड्यांमधील तिचे सुंदर आणि मनमोहक फोटो सोशल मिडियावर शेअर केले. या साड्यांमध्ये खूपच सौंदर्य शब्दांत वर्णन करता येणार नाही असे दिसत आहे. हे फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून स्मिताचे चाहते तिच्या या लूकला पसंत करत आहेत.

आज नवरात्रीचा सहावा दिवस असून आजचा रंग हिरवा आहे. या निमित्ताने स्मिताने हिरव्यागार रंगाच्या साडीत आपले खास फोटोशूट केले आहे.

अलीकडेच तिने गोल्डन ड्रेसमधील हॉट फोटो सध्या सोशल मिडियावर शेअर केले होते. हे फोटोंनी सोशल मिडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. हेही वाचा- अभिनेत्री स्मिता गोंदकर चा गोल्डन ड्रेसमधील हॉट लूक सोशल मिडियावर घालतोय धुमाकूळ

स्मिता जरी बिग बॉस मराठीची स्पर्धक असली तरीही ती खरी प्रसिद्धीस आली ती 'पप्पी दे पारूला' या अल्बममुळे. अलीकडेच ती 'ये रे ये रे पैसा 2' (Ye re Ye Re Paisa 2) या चित्रपटात देखील दिसली होती. या चित्रपटासाठी तिने केलेले सेक्सी बिकिनी फोटो शूटही सोशल मिडियावर बरेच व्हायरल झाले होते.