अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या विनोदी चित्रपटाच्या यादीत आणखी एका चित्रपटाची भर, 'लग्नकल्लोळ' असे आहे ह्या चित्रपटाचे नाव
'लग्नकल्लोळ' (Lagnkallol)असे ह्या चित्रपटाचे नाव असून नुकतीच ह्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.
बॉलिवूडच्या 'सिम्बा'(Simmba) ह्या चित्रपटातून आपली वेगळी अशी छाप सोडलेला अभिनेता सिद्धार्थ जाधव(Siddharth Jadhav) पुन्हा एकदा मराठी सिनेमात धमाल करण्यासाठी सज्ज झालाय. 'लग्नकल्लोळ' (Lagnkallol)असे ह्या चित्रपटाचे नाव असून नुकतीच ह्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ह्या सिनेमाचा मुहूर्त पार पडला असून, ह्या सोहळ्यासाठी बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शक जोडी अब्बास-मस्तान (Abbas-Mastan) यांनी विशेष उपस्थिती लावली होती. चित्रपटाच्या नावावरुन तरी ह्या चित्रपटाची कथा लग्न ह्या विषयाच्या अवतीभवती फिरते असं दिसतयं.
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातला महत्त्वाचा क्षण आणि महत्त्वाचा टप्पा असतो. मात्र लग्नानंतर सुरु होते, ती खरी तारेवरची कसरत.. कारण सुरु होतो संसार आणि एक नवीन जबाबदारी. याच संकल्पनेवर आधारित 'लग्नकल्लोळ' हा धमाल विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अभिनेता सिद्धार्थ जाधव एका प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. आता सिद्धू म्हटलं तर, ह्या चित्रपटात विनोदाची आणि हास्याची काही कमी नसणार, हे काही वेगळं सांगायची गरज नाही.
मयूर तिरमखे निर्मित आणि मोहम्मद बर्मावाला दिग्दर्शित 'लग्नकल्लोळ' हा चित्रपट येत्या काही महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ह्या सिनेमात सिद्धूसोबत अभिनेता भूषण प्रधान(Bhudhan Pradhan) तसेच अभिनेत्री मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh) प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्यासोबत भारत गणेशपुरे(Bharat Ganeshpure), प्रिया बेर्डे, प्रतिक्षा लोणकर(Pratiksha Lonkar), सुप्रिया कर्णिक, विद्या करंजीकर, अमिता कुलकर्णी, संतोष तिरमख आणि डॉ. आशिष गोखले अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.
रणवीरचा दमदार अभिनय, सिद्धार्थची एनर्जी आणि रोहित शेट्टीचे दिग्दर्शन म्हणजे पैसा वसूल 'Simmba'
चित्रपटाच्या नावावरुन जरी हा चित्रपट हा चित्रपट लग्न ह्या विषयावर वाटत असला, तरीही ह्यात हा विषय एका वेगळ्या आणि विनोदी रुपात प्रेक्षकांसमोर मांडण्यात येणार असल्याचे ह्या चित्रपटाच्या टीमचे म्हणणे आहे.