Sai Lokur Wedding Card: ठरलं! सई लोकुर आणि तीर्थदिप रॉय यांच्या लग्नपत्रिका आली समोर, #SAIDEEPROY म्हणत शेअर केला हा सुंदर Video
या लग्नसोहळ्यात देवकार्यापासून रिसेप्शनपर्यंत सर्व विधिवत कार्यक्रम होणार आहेत. यात व्हिडिओमध्ये सईने #SAIDEEPROY वापरत आपल्या लग्नाचे आमंत्रण आपल्या चाहत्यांना दिले आहे.
बिग बॉस मराठी सीजन 1 मध्ये लोकप्रिय झालेली सई लोकुर (Sai Lokur) हिला लग्नाचे वेध लागले आहेत. लवकरच तिच्या घरी सनई-चौघडे वाजणार असून गेल्या कित्येक दिवसांपासून चाहत्यांना ज्या गोष्टीची उत्सुकता लागून राहिली होती ती सईच्या लग्नाची तारीख अखेर समोर आली आहे. येत्या 30 नोव्हेंबरला सई लोकुर आणि तीर्थदिप रॉय (Tirthdeep Roy) दोघेही विवाहबंधनात अडकणार असून याबाबतची माहिती सईने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक सुंदर व्हिडिओ शेअर करुन दिली आहे. आपल्या लग्नपत्रिकेचा (Wedding Card) एक सुंदर व्हिडिओ तिने शेअर केला आहे. यात 27 नोव्हेंबरपासून 30 नोव्हेंबरपर्यत त्यांचे वेगवेगळे विधी होणार आहेत.
या लग्नसोहळ्यात देवकार्यापासून रिसेप्शनपर्यंत सर्व विधिवत कार्यक्रम होणार आहेत. यात व्हिडिओमध्ये सईने #SAIDEEPROY वापरत आपल्या लग्नाचे आमंत्रण आपल्या चाहत्यांना दिले आहे.हेदेखील वाचा- Sai Lokur Engagement Photos: सई लोकूर चा झाला अखेर साखरपुडा, कोण आहे सईचा जोडीदार, पाहा या सोहळ्याचे सुंदर फोटोज
पाहा व्हिडिओ
सई लोकुर हिने शेअर केलेल्या लग्नपत्रिकेच्या व्हिडिओनुसार, 27 नोव्हेंबर तिचा देवकार्य विधी होणार आहे. 28 नोव्हेंबरला मेहंदी, 29 नोव्हेंबरला हळदी आणि सीमंत पूजा व हळदी, 30 नोव्हेंबरला लग्न आणि रिसेप्शन असे सर्व साग्रसंगीत विधी होणार आहे. या सर्व विधींमध्ये सोशल डिस्टंसिंगची योग्य ती खबरदारी घेतली जाणार आहे. त्याचबरोबर या सर्व विधींमध्ये सईने विशेष रंगाचे ड्रेसकोड देखील ठेवले आहेत.
2 ऑक्टोबर ला सई आणि तीर्थदिप रॉय यांचा साखरपुडा संपन्न झाला. साखरपुड्याच्या काही दिवस आधी आपल्या होणा-या नव-याला घेऊन चाहत्यांसमोर अनेक कोडी घातली होती. त्यानंतर साखरपुड्याचे फोटो पाहून सईचा होणारा नवरा कोण याचे उत्तर तिच्या चाहत्यांना मिळाले.
सई लोकूर बिग बॉस आधी 2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करु’ या हिंदी चित्रपटात देखील झळकली होती. यात सईने कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका साकारली होती.