Raj Kundra & Digital Pornography: अरे तो Umesh Kamat मी नव्हे! प्रसारमाध्यमांच्या बेजबाबदारपणावर मराठी अभिनेता उमेश कामत याच्याकडून संताप, कारवाईचाही इशारा
मात्र, अभिनेता उमेश कामत यांनी सोशल मीडियाच्यामाध्यमातून हे वृत्त निराधार आणि तितकेच बेजबाबदार असल्याचे सांगत संबंधीत वृत्तवाहिन्यांच्या वृत्ताचे स्क्रिनशॉटही पोस्टसोबत जोडले आहेत.
प्रसारमाध्यमांच्या बेजबाबदारपणामुळे अभिनेता उमेश कामत (Marathi Actor Umesh Kamat) यांच्यावर संताप व्यक्त करण्याची वेळ आली आहे. आपल्या फेसबुक या सोशल मीडिया अकाऊंटवरुन उमेश कामत (Umesh Kamat) यांनी संबंधीत प्रसारमाध्यमांवर संताप व्यक्त करत कारवाईचा इशारा दिला आहे.घटना डिजिटल पोर्नोग्राफी (Digital Pornography) म्हणजेच अश्लील चित्रफिती आणि उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्या अटक प्रकरणाशी संबंधीत आहे.डिजिटल पोर्नोग्राफी प्रकरणात उद्योगपती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांकडून अटक झाली. दरम्यान, या अटकेसोबतच राज कुंद्रा यांच्यासोबतच्या संबंधामुळे उमेश कामत हे नावदखील चर्चेत आले आहे. उमेश कामत नावावरुन अनेकांच्या भूवया उंचावल्या जात आहेत. आघाडीच्या समजल्या जाणाऱ्या काही उतावीळ प्रसारमाध्यमांनी तर नामसाधर्म्यावरुन मराठी अभिनेता असलेल्या उमेश कामत यांचा संबंध थेट राज कुंद्रा याच्या उद्योगाशी लावला आहे. मात्र, अभिनेता उमेश कामत यांनी सोशल मीडियाच्यामाध्यमातून हे वृत्त निराधार आणि तितकेच बेजबाबदार असल्याचे सांगत संबंधीत वृत्तवाहिन्यांच्या वृत्ताचे स्क्रिनशॉटही पोस्टसोबत जोडले आहेत.
उमेश कामत यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्य संताप व्यक्त करत म्हटले आहे की, ''आज राज कुंद्रा प्रकरणात चालवण्यात आलेल्या बातमीमध्ये, या प्रकरणातील एक आरोपी 'उमेश कामत' याचा फोटो म्हणून माझा फोटो लावला जातो आहे. कुठलीही शहानिशा न करता वृत्तवाहिन्यांनी या प्रकरणात माझा फोटो लावून माझी बदनामी केली आहे. या प्रकरणामुळे होणाऱ्या माझ्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक हानीसाठी या वृत्तमाध्यमांना जबाबदार धरले जाईल. या प्रकरणी मी योग्य ती कायदेशीर कारवाई निश्चित करेन.- उमेश कामत'' (हेही वाचा, Raj Kundra & Digital Pornography: पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झालेले राज पाहा किती कंपन्यांचे संचालक? )
दरम्यान, केवळ उमेश कामत यांच्याबाबतच नव्हे तर, या आधी इतरही अनेक प्रकरणांमध्ये प्रसारमाध्यमांनी वार्तांकन करताना अथवा वृत्त देताना अनेक गफलती केल्याचे वारंवार पुढे आले आहे. अनेकदा निधनवृत्त, सनसनाटी प्रकरणे, आर्थिक गैरव्यवहार, गुन्हेगारी यांसारख्या अनेक विषयांबाबत वृत्त देताना चुकीच्या व्यक्तींचे उल्लेख, चुकीचे फोटो व इतर अशाय प्रसिद्ध केला गेला आहे. त्यामुळे अनेकांना नाहक बदनामी आणि मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी आपली जबाबदारी, मर्यादा आणि भूमिका यांचे भान बाळगून वार्तांकन करावे, अशी भावना अभ्यासक आणि सर्वसामान्यांकडून नेहमीच व्यक्त करण्यात येते.
मराठी अभिनेता उमेश कामत फेसबुक पोस्ट
काय आहे प्रकरण?
डिजिटल पोर्नोग्राफी (Digital Pornography) म्हणजेच अश्लील चित्रफिती बनवून मोबाईल अॅपच्या माध्यमातून प्रसारीत करण्याच्या आरोपाखाली उद्योगपती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांनी नुकतीच अटक केली. हे राज कुंद्रा हे बहुचर्चीत उद्योगपती असून त्यांची विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक असल्याचे पुढे आले आहे. प्राप्त माहितीनुसार, उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) जवळपास नऊ कंपन्यांचे संचालक (डायरेक्टर) आहेत. या पैकी आर्म्सप्राइम मीडिया (Armsprime Media) ही कंपनी सध्या गाजत असलेल्या वादग्रस्त प्रकरणात चर्चेत आहे. या कंपनीचे संजय कुमार त्रिपाठी आणि सौरभ कुशवाह असे दोन संचालक आहेत. आर्म्सप्राइम मीडिया प्राइवेट लिमिटेड ही कंपनी फेब्रुवारी 2019 मध्ये स्थापन करण्यात आलेली एक खासगी कंपनी आहे. रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, मुंबई येथे एक बिगरशासकीय कंपनी म्हणून या कंपनीचे वर्गीकरण आहे. कंपनीची अधिकृत भागभांडवल गुंतवणूक 10 लाख रुपये इतकी आहे. ही कंपनी खेळ आणि मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे.