Hirkani Teaser Poster: प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' सिनेमाची पहिली झलक; 24 ऑक्टोबरला सिनेमा येणार भेटीला
24 ऑक्टोबरला यंदा दिवाळीमध्ये हा सिनेमा रीलिज होणार आहे.
Hirkani Teaser Poster: अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) याने मातृदिनाचं औचित्य साधून त्याच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. 'हिरकणी' (Hirkani) असं या सिनेमाचं नाव असून येत्या दिवाळीमध्ये हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. शिवाजी महाराजांच्या राज्यात रायगडावर हिरकणी या शूर महिलेने तिच्या बाळासाठी गड किल्ला उतरून बाळाची दूधाची तहान पूरी केली होती इतिहासाच्या पानांमधील हा इतिहास लवकरच रूपेरी पडद्यावर साकारला जाणार आहे. 24 ऑक्टोबरला यंदा दिवाळीमध्ये हा सिनेमा रीलिज होणार आहे.
हिरकणी या सिनेमाचं टीझर पोस्टर काही तासांपूर्वी प्रसाद ओकने सोशल मीडियामध्ये शेअर केले आहे. यामध्ये हिरकणीच्या प्रवासाची आणि शौर्याची कथा साकारली जाणार असल्याची काही दृश्यांच्या माध्यमातून स्पष्ट होते. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रसाद ओक याने केले असून लेखन चिन्मय मांडलेकर याचे आहे. या सिनेमामध्ये मध्यवर्ती भूमिकेत नेमकी कोणती कलाकार असेल याबाबत अद्याप गुप्तता पाळण्यात आली आहे. Fatteshikast Poster: शिवाजी महाराजांच्या भूमिकेत चिन्मय मांडलेकर; फत्तेशिकस्त 15 नोव्हेंबरला होणार प्रदर्शित
हिरकणी टीझर पोस्टर
कच्चा लिंबू या सिनेमातून प्रसाद ओकने दिग्दर्शन क्षेत्रामध्ये पदार्पण केले आहे. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आले आहे. 'ये रे ये रे पैसा' हा प्रसादचा सध्या प्रदर्शित झालेला शेवटचा सिनेमा बॉक्सऑफिसवरही सुपरहीट ठरला.