Neha Pendse साठी तिच्या पती शार्दुलने फुलांच्या पायघड्या घालून Valentine's Day ला दिले 'हे' सरप्राईज, Watch Video
त्याने नेहाचे खास फुलांच्या पायघड्या घालून तिचे स्वागत केले.
अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) हिने 5 जानेवारी 2020 रोजी शार्दुल सिंह बयास (Shardul Singh Bayas) याच्यासोबत विवाह केला. तिचे लग्न हे खूप थाटामाटात आणि शाही पद्धतीने पार पडले. त्यानंतर या दोघांचे खूप क्युट फोटोज आणि व्हिडिओज नेहा आपल्या सोशल अकाउंटवरुन शेअर करत होती. मात्र आज व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day) निमित्ताने तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला व्हिडिओ पाहून तुम्हा सर्वांचेच डोळे चक्रावतील. नेहा पेंडसेच्या पतीने शार्दुलने नेहासाठी खूप सरप्राईज दिलं. त्याने नेहाचे खास फुलांच्या पायघड्या घालून तिचे स्वागत केले.
या व्हिडिओमध्ये नेहा खूप छान गाऊन परिधान केलेला आहे. यात शार्दुलची तिची वाट पाहत असून नेहासाठी त्याने व्हॅलेंटाईन डे निमित्त छान सरप्राईज अरेंज केले आहे.हेदेखील वाचा- Neha Pendse Marriage: 'शार्दूल राव आहेत बरे' म्हणत नेहा पेंडसे ने लग्नात घेतलेला उखाणा ऐकलात का?
यात ती समोरून फुलांच्या पायघड्या ज्या दिशेला आहेत त्या दिशेने शार्दुलकडे येताना दिसत आहे. त्यानंतर राहुलच्या समोर येताच त्याला मिठी मारून त्याचे चुंबन घेतलेले या व्हिडिओत पाहायला मिळेल. पुढे तिच्यासाठी त्याने परफेक्ट डेटसाठी खास टेबल सजवला आहे.
नेहा आणि शार्दूलच्या साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंतच्या सर्व विधींचे फोटोज आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्या दोघांनीही लग्नासाठी परिधान केलेला पोशाख सोशल मिडियावर व्हायरल झाला होता.
आपण आपल्या स्वप्नातील राजकुमाराशी लग्न केल्याचा आनंद स्पॉटलाईटशी बोलताना सांगितला. नेहाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, चित्रपटांसह तिने अनेक मालिकांमधूनही काम केलं आहे. शिवाय सुप्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस 11' मध्येही नेहा सहभागी झाली होती.