Navra Maza Navsacha 2 Box Office Collections Day 1: ‘नवरा माझा नवसाचा २’ ची दमदार ओपनिंग, पहिल्या दिवशी कमावले 2.25 कोटी
‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपट काल शुक्रवारी म्हणजेच 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी मोठी कमाई केली. पहिल्या दिवशी चित्रपटाने 2.25 कोटींची कमाई केली.
Navra Maza Navsacha 2 Box Office Collection Day 1: ‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपट काल शुक्रवारी म्हणजेच 20 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी मोठी कमाई (Navra Maza Navsacha 2 Collections)केली. पहिल्या दिवशी चित्रपटाने 2.25 कोटींची कमाई केली. सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar)आणि सुप्रिया पिळगांवकर(Supriya Pilgaonkar) यांचा नवरा माझा नवसाचा 2 (Navra Maza Navsacha 2) हा बहुप्रतिक्षीत चित्रपट होता. 19 वर्षांपूर्वी आलेल्या ‘नवरा माझा नवसाचा’ चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. चित्रपटाच्या टीझर व ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता चित्रपटाची कमाई समोर आली आहे. (हेही वाचा:Navra Maza Navsacha 2: ‘नवरा माझा नवसाचा 2’ मधील पहिलं गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; सचिननी पोस्ट शेअर करत दिली माहिती )
सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा 2’ या चित्रपटाची निर्मिती केली. कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले आहे. संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे. (हेही वाचा: Navra Maaza Navsaacha 2: नवरा माझा नवसाचा 2 चित्रपटाचा धमाकेदार टीजर लाँच)
नवा नवस नवा प्रवास
‘नवरा माझा नवसाचा 2’ चित्रपटात नवा नवस अन् नवा प्रवास दाखवण्यात आला आहे. या सिक्वेल चित्रपटात एसटीऐवजी रेल्वेचा प्रवास दाखवण्यात आला आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी दोन कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या टीमने अद्याप अधिकृत आकडेवारी शेअर केलेली नाही. पण मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, सांगली या जिल्ह्यांमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)