‘मोगरा फुलला’ सिनेमाचं नवं पोस्टर; नीना कुळकर्णी - स्वप्नील जोशी 14 वर्षांनी एकत्र करणार काम

Mogra Phulaalaa Poster (File Photo)

Mogra Phulaalaa New Poster: श्रावणी देवधर दिग्दर्शित आगामी मराठी सिनेमा 'मोगरा फुलला'(Mogra Phulaalaa)  या सिनेमामध्ये स्वप्नील जोशी (Swwapnil Joshi)  मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आज या सिनेमाचं नवं पोस्टर लॉन्च करण्यात आलं आहे. यामध्ये अभिनेत्री नीना कुळकर्णी (Neena Kulkarni) त्याच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'आपुलकीच्या नात्यात गुंतलेली ओढ' अशा भावूक अंदाजावर हे पोस्टर साकारलं आहे. ‘मोगरा फुलला’ सिनेमातील Swwapnil Joshi च्या लुकची पहिली झलक

स्वप्नील जोशीबरोबर नीना कुळकर्णी तब्बल 14 वर्षांनी पुन्हा काम करणार आहेत. हा अनुभव सुखद असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. स्वप्नील जोशी याच्याबरोबर साई देवधर, नीना कुळकर्णी, चंद्रकांत कुलकर्णी, संदीप पाठक, सुहिता थत्ते, आनंद इंगळे, समिधा गुरु, विघ्नेश जोशी, संयोगिता भावे, दीप्ती भागवत, प्राची जोशी, सानवी रत्नालीकर, आशिष गोखले, प्रसाद लिमये, हर्षा गुप्ते, सोनम निशाणदार, सिद्धीरूपा करमरकर, माधुरी भारती, सुप्रीत कदम, अनुराधा राजाध्यक्ष आणि आदित्य देशमुख हे कलाकार दिसणार आहेत.

नीना कुळकर्णी मागील काही वर्षांपासून हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये काम करत आहेत. 'ये है मोहबत्ते' या हिंदी मालिकेचा त्या एक भाग आहेत. 'मोगरा फुलला'सोबतच त्यांनी 'पॉंडिचेरी' या मराठी सिनेमामध्येही त्या झळकणार आहेत.  'मोगरा फुलला' हा सिनेमा 14 जून 2019 रोजी रीलिज होणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif