Marathi Bold Song: बिकिनीमध्ये अभिनेत्री तर शर्टलेस हिरो, थंडीमध्ये 'या' मराठी गाण्याने तापवले वातावरण; पहा Hot Scenes ने भरलेले हे गीत (Video)
गाण्याच्या सुरुवातीलाच हिनाचा साडीमधील मादक लुक पाहून प्रेक्षक जवळजवळ घायाळ होतो. त्यानंतर संपूर्ण गाण्यात या दोघाने अनेक बोल्ड सिन्स पाहायला मिळतात. या गाण्यात अभिनेत्यांनी केलेला अभिनयही अतिशय बोल्ड आहे
Marathi Hot Video: काळासोबत बदलत, प्रेक्षकांच्या आवडीनिवडी लक्षात घेत मराठी चित्रपटांमध्ये बोल्ड विषय (Bold Subject), बोल्ड सिन्स (Bold Scene), किसिंग सीनची (Kissing Scene) हाताळणी सुरु झाली. याच पठडीतला ‘शिकारी’ (Shikari) हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. महेश मांजरेकर प्रस्तुत, विजू माने दिग्दर्शित ‘शिकारी’ या चित्रपटात बोल्ड दृश्य आणि डबल मिनिंग संवादांचा भरणा होता. सुव्रत जोशी (Suvrat Joshi) आणि नेहा खान (Neha Khan) या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटामधील अनेक गाणी व संवाद त्याच्या बोल्डनेसमुळे फार गाजली होती असेच एक गाणे होते ‘शहारल्या तनात मलमली’. या गाण्यामध्ये सुव्रत आणि नेहाची सेक्सी केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.
गाण्याच्या सुरुवातीलाच नेहाचा साडीमधील मादक लुक पाहून प्रेक्षक जवळजवळ घायाळ होतात. त्यानंतर संपूर्ण गाण्यात या दोघांचे अनेक बोल्ड सिन्स पाहायला मिळतात. या गाण्यात अभिनेत्यांनी केलेला अभिनयही अतिशय बोल्ड आहे, जो आपण एकट्यानेच पाहिलेला बरा. यातील पाण्यातील सीन हा सर्वात बोल्ड सीन आहे, ज्यामध्ये बिकिनीमध्ये अभिनेत्री व शर्टलेस हिरो दिसून येतो. या गाण्यामधील दृश्य पाहून जणू काही थंडीमध्ये 'या' मराठी गाण्याने वातावरण तापवले असल्याचे भासते. यामध्ये सुव्रतच्या भूमिकेचे कौतुक करायला हवे कारण त्याने नेहमीची आपली इमेज मोडून काहीतरी नवीन द्यायचा प्रयत्न केला आहे. (हेही वाचा: सई ताम्हणकरच्या 'या' बोल्ड किसिंग सीनने घातला होता धुमाकूळ; आजूबाजूला कोणी नसतानाच पहा हा Video)
पहा गीत -
हे गीत जुली जोगळेकरने गायले असून, संगीत अजित परबचे आहे तर हे गीत गुरु ठाकूरने लिहिले आहे. दरम्यान सुव्रत आणि नेहा खान यांच्यासोबत मृण्मयी देशपांडे, भाऊ कदम, सिद्धार्थ जाधव, भारत गणेशपुरे यांच्या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या कथेबद्दल दिग्दर्शक विजू माने सांगतात की, ‘स्त्रीत्वाचा गैरफायदा घेणाऱ्या श्वापदांनी भरलेल्या जंगलात अडकलेल्या एका देखण्या हरिणीची गोष्ट, असे काहीसे वर्णन या कथेचे करता येईल.’
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)