Saie Tamhankar Bold Kissing Scene: सई ताम्हणकरच्या 'या' बोल्ड किसिंग सीनने घातला होता धुमाकूळ; आजूबाजूला कोणी नसतानाच पहा हा Video
'सई ताम्हणकर' (Photo Credit : Instagram)

महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) तिचे बोल्ड लुक्स (Bold Looks), अभिनय, चित्रपटांची निवड अशा अनेक गोष्टींमुळे प्रसिद्ध आहे. मराठी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये बिकनीमध्ये धुमाकूळ घालणारी ती पहिली अभिनेत्री असावी. त्यावेळी सईवर प्रचंड टीका झाली होती मात्र सईने अशा गोष्टींकडे लक्ष न देता, आपल्या कामावर लक्ष केंद्रित केले. त्यानंतर सईने अनेक चित्रपटांमध्ये बोल्ड सिन्स, किसिंग सिन्स (Kissing Scens) दिले, मात्र ‘हंटर’ (Hunter) या चित्रपटातील तिचा किसिंग सीन अतिशय खास ठरला होता. गुलशन देवय्या याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली होती.

हंटर या सेक्स अ‍ॅडिक्शन वर भाष्य करणार्‍या बोल्ड विषयावरील सिनेमामध्ये सई आणि राधिका या दोन मराठी प्रसिद्ध अभिनेत्रींनी भूमिका साकारली होती. या सिनेमातील सईच्या खास अंदाजामुळेही खूप चर्चा रंगल्या होत्या. सेक्सचा शौकीन असलेल्या एका मुलाची कथा प्रेक्षकांना हंटर या चित्रपटात पाहायला मिळाली होती. ब्ल्यू फिल्म पाहाणे, तरुणींचा पाठलाग करणे, महिलांसोबत संबंध ठेवणे या तरुणाच्या आवडत्या गोष्टी असतात. या चित्रपटातील सईचा किचनमधील किसिंग सीन प्रचंड गाजला होता. (हेही वाचा: 'टकाटक' चित्रपटातील 'या' गाण्याने पार केल्या होत्या Boldness च्या सर्व सीमा; आतापर्यंत मिळाले तब्बल 11 मिलिअन पेक्षा जास्त व्ह्यूज)

पहा व्हिडिओ -

दरम्यान, सांगलीत जन्मलेल्या सई ताम्हणकरने मुंबईत येऊन स्वतःच्या बळावर मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपले स्थान निर्माण केले. सनई चौघडे हा तिचा पहिला गाजलेला मराठी चित्रपट होय. त्याआधी तिने अनेक मालिका व चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका केल्या होत्या. दरम्यान, मराठी चित्रपट कात टाकत आहे, मराठी भाषेतही अनेक बोल्ड विषय हाताळले जात आहे. मागच्यावर्षी टकाटक (TakaTak) नावाचा चित्रपट आला होता, जो अनेक बोल्ड शोट्स, किसिंग सिन्स व त्यातील नग्नतेमुळे लोकप्रिय ठरला होता.