Panghrun Marathi Movie: महेश मांजरेकरांचा 'पांघरुण' चित्रपट लवकरच झळकणार रुपेरी पडद्यावर, 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीस

महेश मांजरेकरांचा आगामी चित्रपट 'पांघरुण' (Panghrun) लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. महेश मांजरेकराचा दिग्दर्शन असलेला 'पांंघरुण' चित्रपट 11 फेबुवारीला प्रेंक्षकांच्या भेटीला येत आहे.

Panghrun Movie (Photo Credit - Instagram)

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि झी स्टुडिओज (Zee Studio) यांच्या यशाचं एक वेगळं समीकरण आहे. काकस्पर्श, नटसम्राट यांसारख्या उत्तमोत्तम आणि यशस्वी चित्रपट देवुन महेश मांजरेकरांचा आगामी चित्रपट 'पांघरुण' (Panghrun) लवकरच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. महेश मांजरेकरांच दिग्दर्शन असलेला 'पांंघरुण' चित्रपट 11 फेबुवारीला प्रेंक्षकांच्या भेटीला येत आहे. अमोल बावडेकर (Amol Bavdekar), गौरी इंगवले (Gauri Ingawale), रोहित फाळके (Rohit Phalke), विद्याधर जोशी (Vidyadhar Joshi), सुरेखा तळवलकर (Sulekha Talwalkar) हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. हितेश मोडक, डॉ. सलील कुलकर्णी, पवनदीप राजन आणि अजित परब यांचं संगीत आणि वैभव जोशी यांच्या शब्दांनी सजलेल्या या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ही अनोखी गाठ आणि इलुसा हा देह या गाण्यांना तर सोशल मीडियावर लाखो व्ह्यूव्ज मिळाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

 

पांघरुन चित्रपट अनेक महोत्सवासाठीही चित्रपटाची निवड झाली. 18व्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हल, 28व्या ऑस्टिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, मामी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये पांघरुण चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. बंगळुरु आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रभारती इंडियन सिनेमा कॉम्पिटेशन या विभागात सर्वोकृष्ट भारतीय चित्रपट हा मानाचा पुरस्कारही पांघरुणने पटकावला. (हे ही वाचा Sher Shivraj: पावनखिंडनंतर दिग्पाल लांजेकरांचा 'शेर शिवराज' होणार 'या' दिवशी प्रर्दर्शित.)

लाॅकडाऊन नंतर मराठीतील बिग बजेट 'झिम्मा' चित्रपटाला प्रेक्षंकाची चांगली पंसती मिळाली तसेच कोट्यावधी कमाई करुन झिम्मा सुपरहिट ठरला. त्यानंतर भाऊ कदम आणि कुशल बद्रिके याचा 'पांडु' असलेला चित्रपटानेही प्रेक्षकांची मने जिंकली. त्यामुळे पांघरुन चित्रपटाला प्रेक्षक कशी पंसती मिळेल हे बघावे  लागेल. येत्या 11 फेब्रुवारीला ‘पांघरुण’ संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

 

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now