Tarri Film Motion Poster: ललित प्रभाकर चा 'टर्री' सिनेमात नववर्षात प्रेक्षकांच्या भेटीला!
मराठी सिनेसृष्टीतील हँडसम हँक ललित प्रभाकर याचा नवाकोरा सिनेमा 'टर्री' नववर्षात प्रेक्षकांच्या भेटीला आहे. सिनेमाचे मोशन पोस्टर ललितने सोशल मीडियावर शेअर केले आहे. या सिनेमातून एका बिनधास्त, बेधडक तरुणाई गोष्ट पाहायला मिळणार असे प्रथमदर्शनी वाटत आहे.
मराठी सिनेसृष्टीतील हँडसम हँक ललित प्रभाकर (Lalit Prabhakar) याचा नवाकोरा सिनेमा 'टर्री' (Tarri) नववर्षात प्रेक्षकांच्या भेटीला आहे. सिनेमाचे मोशन पोस्टर (Motion Poster) ललितने सोशल मीडियावर शेअर केले आहे. या सिनेमातून एका बिनधास्त, बेधडक तरुणाई गोष्ट पाहायला मिळणार असे प्रथमदर्शनी वाटत आहे. ललितने या सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करताना आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "नव्या जोशात, नव्या जोमात, टर्री येतोय, टर्रारुन .. टरकवायला नव्या वर्षात…"
टर्री हा शब्द ग्रामीण भागात बोलीभाषेत वापरला जातो. टर्री म्हणजे बेधडक, बेफिकीर. प्रचंड ऊर्जा आणि धमक असलेला. अशा तरुणाला टर्रीबाज म्हटलं जातं. (COLORफुल Movie New Poster: कलरफुल चित्रपटाचे नवे पोस्टर झाले प्रदर्शित, सई ताम्हणकर- ललित प्रभाकर ही जोडी प्रथमच येणार प्रेक्षकांच्या भेटीस)
ललित प्रभाकर ट्विट:
‘ऑन युव्हर स्पॉट प्रॅाडक्शनने ‘प्रियामो एन्टरटेन्मेंट’ यांनी एकत्रितपणे टर्री या सिनेमाची निर्मिती केली आहे. प्रतीक चव्हाण, अक्षय आढळराव पाटील आणि विक्रम धाकतोडे या सिनेमाचे निर्माते असून महेश रावसाहेब काळे यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. पुढील वर्षी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून अभिनेता ललित प्रभाकर घराघरांत पोहचला. त्यानंतर अनेक सिनेमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला असला तरी आनंदी गोपाळ मधील त्याची भूमिका लक्षवेधी ठरली. त्याचबरोबर हंप्पी, स्माईल प्लीज यांसारख्या वेगळ्या धाटणीच्या सिनेमातूनही त्याने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता टर्री या सिनेमातील ललितचा अनोखा अंदाज प्रेक्षकांना कितपत भावतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)